Nick Jonas Shared With Priyanka Chopra Unseen Old Picture Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nick Jonas And Priyanka Chopra : निक जोनासने ६ वर्षांपूर्वी प्रियांकाला घातली होती लग्नाची मागणी; पहिल्यांदाच शेअर केला 'तो' खास फोटो…

Nick Jonas Shared Unseen Old Picture : निक जोनासने एक खास पोस्ट शेअर करत पत्नी प्रियंकाला धन्यवाद म्हणाला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणजेच प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान प्रस्थापित केलं आहे. नुकताच प्रियंका चोप्राचा ४२ वा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवशी तिला सर्वांनीच खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण तिचा पती गायक निक जोनासनेही तिला खास पोस्ट शेअर करत तिचा वाढदिवस स्पेशल सेलिब्रेट केला. अशातच निक जोनासने एक खास पोस्ट शेअर करत पत्नी प्रियंकाला धन्यवाद म्हणाला आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास कायमच चर्चेचा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. अमेरिकन गायक आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनासने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये त्याने दोघांचाही एक रोमँटिक फोटो शेअर केलेला आहे. या दोघांनीही १ डिसेंबर २०१८ ला लग्नगाठ बांधली. त्याचवर्षी दोघांनीही एकमेकांना प्रपोज करून लग्नाची मागणी घातली होती. निकने हा रोमँटिक फोटो शेअर करण्याचं कारण म्हणजे, निक आणि प्रियंकाची काल (२० जुलै) रिलेशनशिप ॲनिव्हर्सरी होती. या निमित्त निक जोनासने एक खास पोस्ट शेअर केलेली आहे.

निकने सहा वर्षांपूर्वी अर्थात २० जुलै २०१८ रोजी ग्रीसमध्ये प्रियंकाला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी लग्न केलं. शेअर केलेल्या फोटोमध्ये, निकने प्रियंकाचा हात आपल्या हातात घेतल्याचं दिसत आहे. तर तिच्या हातात एक सुंदर डायमंड रिंग पाहायला मिळत आहे. सहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत निक जोनासने पोस्टमध्ये लिहिलंय की, ' आज ६ वर्षांपूर्वी मी एका सुंदर आणि विस्मयकारक स्त्रीला लग्नाची मागणी घातली होती. तिने मला होकार दिल्याबद्दल धन्यवाद!' निकच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर, 'सुंदर जोडी' अशी कमेंट करत चाहत्यांनी दोघांनाही सुंदर जोडी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंका आणि निकमध्ये १० वर्षांचा फरक आहे. प्रियंका ४२ वर्षांची असून निक जोनास ३१ वर्षांचा आहे. प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून निक जोनास हा अमेरिक गायक आहे. या दोघांनाही अनेकदा वयावरून ट्रोल केले जाते. प्रियंका आणि निकने डिसेंबर २०१८ ला लग्नगाठ बांधली. तर २०२२ मध्ये प्रियंकाला मालती नावाची मुलगीही आहे. प्रियंका आणि निकचा सुखाचा संसार सुरू असून ते कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT