Tiger 3 New Promo Saam TV
मनोरंजन बातम्या

Tiger 3 New Promo: 'टायगर ३'चा नवा धमाकेदार प्रोमो रिलीज, इम्रान आणि सलमानमध्ये जुंपली; डायलॉग्जने जिंकलं चाहत्यांचं मन

Tiger 3 Movie: या चित्रपटाची सलमानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपाचे एकापाठोपाठ एक अपडेट समोर येत आहेत.

Priya More

Salman Khan And Emraan Hashmi:

बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सलमानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपाचे एकापाठोपाठ एक अपडेट समोर येत आहेत.

चित्रपटातील सलमानचा लूक, कतरिनाचा लूक, इमरान हश्मीचा लूक, चित्रपटाचे टीझर, त्यानंतर या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक प्रोमो समोर येत आहेत. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. अशामध्ये या चित्रपटाचा नवीन धमाकेदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधील सलमान आणि इम्रानच्या डायलॉगने चाहत्यांची मनं जिंकली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टायगर ३च्या माध्यमातून पुन्हा एकदा सलमान खान आणि कतरिना कैफ हे टायगर आणि झोयाच्या रुपात एका अॅक्शन-थ्रिलरने धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. टायगर 3 च्या नवीन प्रोमोवरून हे सिद्ध होत आहे. टायगर 3 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. टायगर 3 चा नवीन प्रोमो हाय-ऑक्टेन अॅक्शनने भरलेला आहे. फक्त सलमान-इम्रानच नाही तर कतरिनाही नव्या प्रोमोमध्ये जोरदार अॅक्शन दाखवत आहे.

सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाचा नव्या आणि धमाकेदार प्रोमोची सुरुवात चित्रपटातील भयानक खलनायक आतिशच्या भूमिकेतील इमरान हाश्मीच्या संवादाने होते. या अॅक्शन प्रोमोमध्ये दुष्ट मास्टरमाइंड आतिश सुपर एजंट टायगरला धमकावताना दिसत आहे. हा नवा प्रोमो खूपच खतरनाक आहे. ज्यामध्ये इम्रान त्याच्या खतरनाक लूकमध्ये टायगरसोबत फायटिंग करताना दिसत आहे.

या धमाकेदार प्रोमोची सुरुवात इम्रानपासून होते ज्यात आतिश म्हणतोय, 'अब मेरी बारी है, इस बार तुम्हारी है टाइगर, दुनिया के नक्शे से हिन्दुस्तान का वजूद ही मिटा दूंगा मैं। दा करता हूं टाइगर।' यानंतर टायगर आणि झोयाचे धमाकेदार अॅक्शन सीन पाहायला मिळतात. या भूमिकेत इम्रान खूपच वेगळा आणि ताकदवान दिसत आहे. त्याचा लूक पाहून तो खूपच शक्तीशाली वाटत आहे.

त्यानंतर टायगर देखील इम्रानला जबरदस्त उत्तर देतो. टायगर म्हणतो की 'सब ठीक किया तुमने, एक बात भूल गए, जब तक टाइगर मरा नहीं तब तक टाइगर हारा नहीं।' या प्रोमोमधील सलमान आणि इमरानच्या डायलॉगने प्रेक्षकांची मनं जिंकली. ५० सेकंदाच्या या प्रोमोनो प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT