Sonu Sood Deepfake
Sonu Sood Deepfake Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Deepfake: सोनू सूदचा डीपफेक व्हिडीओ होतोय व्हायरल, अभिनेत्याने चाहत्यांना सावध राहण्याचं केलं आवाहन

Priya More

Sonu Sood:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत राहतो. उत्तम अभिनयासोबत सोनू सूद समाजकार्यामुळे चर्चेत असतो. कोरोना काळापासून (Corona) सोनू सूद गरजू आणि गरीब व्यक्तींना मदत करत आहे. त्याची मदत करण्याची ही प्रक्रिया आजही तशीच सुरू आहे. अनेक गरजू लोकं मदत मिळावी यासाठी सोनू सूदच्या बिल्डिंगखाली मोठी गर्दी करत असतात. सोनू सूद देखील मोठ्या मनाने त्यांना मदत करतो.

आता सोनू सूद चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे त्याचा व्हायरल होणारा डीपफेक व्हिडीओ. सोनू सूदला त्याच्या एका फॉलोअरकडून डीपफेक व्हिडिओ मिळाला होता. या व्हिडीओनंतर सोनू सूदने आपल्या चाहत्यांना सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सोनू सूदला नुकताच एका फॉलोअरकडून डीपफेक व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग मिळाले. हा डीपफेक व्हिडीओ पाहून सोनू सूदला मोठा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की सोनू सूद वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज असलेल्या एका कुटुंबाशी संवाद साधत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन देखील देत असल्याचे दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये दिसणारी ती व्यक्ती सोनू सूद नाहीच. सोनू सूद असल्याचे भासवून लोकांची अशाप्रकारे फसवणूक केली जात आहे. या डीपफेक व्हिडीओप्रकरणी सोनू सूदने चिंता व्यक्त केली आहे.

या व्हिडीओनंतर सोनू सूदने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने असे लिहिले आहे की, 'माझा फतेह हा चित्रपट डीप फेक आणि बनावट कर्ज अ‍ॅप्सच्या वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे. सोनू सूद असल्याचे भासवून त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे चॅटिंग करून एका संशयित कुटुंबाकडून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची ही ताजी घटना आहे. अनेक निष्पाप व्यक्ती या सापळ्यात अडकतात. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जर तुम्हाला असे कॉल येत असतील तर सावध रहा. #फतेह'

विशेष म्हणजे अशा घटनांपासून प्रेरित होऊन अभिनेता त्याच्या नवीन थ्रिलर फतेह चित्रपटासाठी लेखक आणि दिग्दर्शक झाला आहे. दीड वर्षांच्या संशोधनानंतर आणि सायबर क्राइम पोलिस अधिकारी आणि नैतिक हॅकर्स यांच्या मुलाखती घेतल्यानंतर सूदने ही कथा लिहिली. या चित्रपटामध्ये सोनू सूद देशाचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्याच्या मोहिमेवर असलेल्या तंत्रज्ञान-जाणकार तपास एजंटची भूमिका साकारणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार

Food Poisoning : उन्हाळ्यात Food Poisoning का होते? 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

Health Tips: फणस खाल्यानंतर 'या' गोष्टींचे चुकूनही सेवन करु नका

T-20 World Cup: पॅट कमिन्सचं लगेज चोरीला, स्टार्क अन् मॅक्सवेलची प्लाईट लेट; सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात गोंधळ

Accident News : भरधाव ट्रक घुसला सलून दुकानात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT