आधी थिएटर आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रांत मेस्सीच्या (Vikran Messy) '१२वी फेल' (12th Fail) चित्रपटाचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. फक्त सेलिब्रिटींनीच नाही तर, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार युवानेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी ट्वीट करत अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार युवानेते रोहित पवार (NCP Rohit Pawar News) यांनी '१२वी फेल' चित्रपट पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यांनी खास फेसबूकवर अभिनेता विक्रांत मेस्सीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाबद्दल आपले विचार व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी '१२वी फेल' चित्रपटाचा आधार घेत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Bollywood Film)
रोहित पवार यांनी '12th Fail' चित्रपटाचं कौतुक केलं असून त्यांनी सरकारकडे पोस्टच्या माध्यमातून एक मागणी ही केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहलं की, "सामान्य कुटुंबातील मुलांना कसा संघर्ष करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारा सद्यस्थितीवरचा #12thFailMovie हा #OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला. सामान्य कुटुंबातील मुलांचा हा संघर्ष प्रत्यक्ष दिसत नसला तरी किमान सिनेमात तरी पाहून कळेल. म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सर्वांनीच हा सिनेमा पाहिला पाहिजे. तरच ते मुलांबाबत #serious होतील, अशी अपेक्षा करू." (OTT)
रोहित पवारांच्या (Rohit Pawar Facebook Post) या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. '12 वी फेल' चित्रपटामध्ये, विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित चित्रपटाची कमी बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असून अनुराग पाठक यांच्या या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. आयपीएस मनोज कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.