Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki रिलीज होण्यापूर्वी किंग खानने चाहत्यांना दिला जबरदस्त सल्ला, म्हणाला - 'सीट मिळणार नाही म्हणून घरातूनच...'

Asksrk Session With Fan: 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Priya More

Dunki Movie:

'पठाण' (Pathan) आणि 'जवान'च्या (Jawan Movie) भरघोस यशानंतर आता बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटामुळे शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं.

या चित्रपटाबाबत शाहरुख खानच्या चाहत्यांच्या मनातील उत्सुकता वाढत चालली आहे. 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे शाहरूख खानला देखील याबाबत मोठा विश्वास आहे. त्यामुळे शाहरुखने आपल्या चाहत्यांना जबरदस्त सल्ला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी शाहरुख खान दररोज आपल्या चाहत्यांना वेगवेगळे सरप्राईज देताना दिसत आहे. बुधवारी शाहरुखने चाहत्यांसाठी डंकीतलं पहिले गाणे 'लूट पुट गया' रिलीज केले. ऐवढंच नाही तर सोशल मीडियावर आस्क एसआरके सेशन पण ठेवले होते. जिथे सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याला अनेक रंजक प्रश्न विचारले आणि शाहरुखनेही त्यांना मजेशीर उत्तरे देखील दिली.

Shah Rukh Khan Tweet

डंकी रिलीज होण्यापूर्वी एसआरकेच्या आस्क सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला विचारले की, 'सर, मी डंकीसाठी पुढची सीट बुक करू की कॉर्नर वन?' यावर गमतीशीरपणे उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, 'भाऊ, मला विश्वास आहे की चित्रपट हाऊसफुल होईल...घरातून सोफा घेऊन ये सीट तर मिळणार नाही.' शाहरुख खानचे हे मजेशीर ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. शाहरुखच्या या उत्तरला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.

शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका चाहत्याने राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपटाचे नाव 'डिंकी' असे का ठेवले असा सवालही केला. ज्यावर शाहरुख खानने त्याला जबरदस्त स्टाईलमध्ये म्हणाला की, 'डंकी हा सीमेपलीकडील अवैध प्रवासाचे वर्णन करण्याचा एक मार्ग आहे. आणि त्याचा उच्चार फंकी...हंकी...किंवा मंकी असा केला जाऊ शकतो.'

दरम्यान, 2023 हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच खास आहे. या वर्षात शाहरुख खानच्या पठान आणि जवान या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटांनी 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता शाहरुखचा डंकी देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT