Sara Ali Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

रमजान महिन्यात Sara Ali Khan ने गरिबांना केलं अन्नदान, पापाराझींना पाहून संतप्त झाली अभिनेत्री; VIDEO व्हायरल

Sara Ali Khan Angry On Paparazzi: सारा अली खान चित्रपटासोबतच तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गरीब व्यक्तींना जेवणाचे बॉक्स वाटताना दिसत आहे.

Priya More

Sara Ali Khan Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या 'मर्डर मुबारक' (Murder Mubarak) आणि 'ऐ वतन मेरे वतन' (Ye Vatan Mere Watan Movie) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या दोन्ही चित्रपटातील दमदार अभिनयामुळे ती सध्या लाइमलाइटमध्ये आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये सारा अली खान विरुद्ध रोल प्ले केले आहेत. सारा अली खान चित्रपटासोबतच तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गरीब व्यक्तींना जेवणाचे बॉक्स वाटताना दिसत आहे.

सारा अली खानला पाहून तिच्या चाहत्यांना कधी कधी ती सामान्य लोकांसारखे आयुष्य जगते असे वाटते. ती सुट्टीवर गेल्यावर झोपडीत राहून चुलीवर स्वयंपाक करताना दिसते. तर कधी ती गरिबांना मदत करताना दिसते. सारा अली खानने नुकताच रमजानच्या पवित्र महिन्यात गरजुंना मदत केली आहे. सारा अली खानचे ही कृती तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडली. तिच्या या कृतीने चाहत्यांचे मन आनंदित झाले आहे.

सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिला एका मंदिराबाहेर कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसले. ऑरेंज कलरचा क्रॉप टॉप आणि ट्रॅक पँट परिधान केली होती. यावेळी तीने गरजूंना अन्नाची पाकिटे वाटली. यावेळी जेव्हा पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली तेव्हा ती खूप संतापली. सारा अली खान पापाराझीना व्हिडीओ शूट करण्यास नकार देत होती. ती पापाराझींना म्हणते की, 'कृपया असे करू नका...' साराला पापाराझींना विनंती करताना पाहून आजूबाजूच्या महिलांनाही पापाराझींचा राग येतो आणि त्या देखील त्यांना फोटो आणि व्हिडीओ काढण्यास नकार देतात.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सारा नुकताच 'ए वतन मेरे वतन' चित्रपटात दिसली होती. तिचा हा चित्रपट 21 मार्च 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला. सध्या साराच्या हातामध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत. 28 वर्षीय सारा अली खान 'मेट्रो... दिस डेज'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'स्काय फोर्स' हा चित्रपट आहे. हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट संदीप केवलानी यांनी लिहिला असून अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वीर पहाडिया, निम्रत कौर हे देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. याशिवाय साराकडे जगन शक्तीचा एक प्रोजेक्ट आहे. ज्याची माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

SCROLL FOR NEXT