Sanjay Leela Bhansali's Heeramandi Webseries's First Look Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Heeramandi Web Series: प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्याची कथा सांगते 'हीरामंडी: द डायमंड बझार', संजय लीला भन्साळींच्या सीरिजचा फर्स्ट लूक आऊट

Heeramandi: The Diamond Bazaar Webseries First Look Out: संजय लीला भन्साळी एका नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. त्यांची 'हीरामंडी: द डायमंड बझार' (Heeramandi: The Diamond Bazaar) या वेबसिरीजची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे.

Priya More

Heeramandi Webseries First Look:

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असतो. त्यांच्या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची कथा जबरदस्त असते त्याचसोबत त्यांच्या चित्रपटातील भव्य सेट आणि शाहीथाट हा सर्वांना प्रचंड आवडतो. त्यामुळे त्यांचे चित्रपट सुपरहिट देखील ठरतात.

पण आता संजय लीला भन्साळी एका नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. त्यांची 'हीरामंडी: द डायमंड बझार' (Heeramandi: The Diamond Bazaar) या वेबसिरीजची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. अखेर त्यांच्या या वेबसीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हिरामंडीचा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

'हीरामंडी: द डायमंड बझार' या वेबसीरिजच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी हे वेब सीरिजच्या जगामध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या वेबसीरिजचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हीरामंडीच्या फर्स्ट लूकमध्ये म्युजिकपासून ते आलिशान सेट पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या वेबसीरीजमध्ये आपल्याला सौंदर्य, ड्रामा, सस्पेंस आणि थ्रिलर यांचे मिश्रण पाहायाला मिळणार आहे हे नक्की. प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्याची कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

'हीरामंडी: द डायमंड बझार'च्या टीझरमध्ये प्रसिद्ध स्टार कास्टचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा आणि रिचा चढ्ढा यांच्यासह मालिकेतील अनेक अभिनेत्रींचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हीरामंडी ही वेबसीरिज संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांइतकेच भव्य आणि नाट्यमय आहे.

'देवदास', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या कथाही हीरामंडी या वेबसीरिजकडून अपेक्षित आहेत. या वेबसीरिजच्या टीझरमध्ये अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा आणि ऋचा चढ्ढा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत. काहीही न बोलता त्या आपल्या स्टाईलने हिरामंडीबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रेम, शक्ती आणि स्वातंत्र्य यांच्यातील लढाई पाहायला मिळणार आहे. यासोबतच हिरामंडीमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताची झलकही दाखवण्यात येणार आहे.

सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी आणि रिचा चढ्ढा यांच्याशिवाय हीरामंडी या वेबसीरिजमध्ये संजीदा शेख आणि शर्मीन सहगल या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सर्व अभिनेत्रींनी या वेबसीरिजसाठी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहेत जेणेकरून त्यांना त्यांच्या भूमिका साकारता याव्यात. हिरामंडी वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण ही वेबसीरिज कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT