Sayaji Shinde B'day: सयाजी शिंदेंचा साधेपणा; बॉलिवूड, टॉलिवूड गाजवलं तरी पाय जमिनीवरच!

Sayaji Shinde Bollywood Movie: सातारा जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आलेले सयाजी शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड गाजवलं आहे. आज ऐवढी प्रतिष्ठा, पैसा आणि नाव कमावलं असून देखील त्यांचे पाय हे जमिनीवरच आहेत.
Sayaji Shinde
Sayaji ShindeSaam TV
Published On

Sayaji Shinde Bday:

मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी नाटक आणि चित्रपट हे दोन्ही माध्यम गाजवली आहेत. फक्त मराठीच नाही तर हिंदीसह साऊथ चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. या हुरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते खूप शुभेच्छा देत आहेत.

सातारा जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आलेले सयाजी शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड गाजवलं आहे. आज ऐवढी प्रतिष्ठा, पैसा आणि नाव कमावलं असून देखील त्यांचे पाय हे जमिनीवरच आहेत. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त (Sayaji Shinde Birthday) आज आपण त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी मिळवली हे जाणून घेणार आहोत...

अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री -

आपली नाटकाची आवड जपण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि अभिनेता व्हायचे मनाशी ठरवले. मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करत असतानाच त्यांनी अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. थिएटर करत असतानाच त्यांना 'अबोली' या चित्रपटामध्ये काम मिळाले. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठी नाटक आणि चित्रपटामध्ये काम करता करता सयाजी शिंदे यांचे नशीब पालटलं. त्यांना हिंदी चित्रपटाची देखील ऑफर मिळाली. राम गोपाल वर्मा यांच्या 'शूल' चित्रपटामध्ये त्यांना बच्चू यादवची भूमिका मिळाली. या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याना एकापाठोपाठ एक जबरदस्त चित्रपट मिळत गेले.

गावच्या मातीशी जोडलेली नाळ -

सयाजी शिंदे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, साताऱ्यामध्ये भैरोबाचा डोंगर आहे. त्यांनी या डोंगरावर जाऊन अभ्यास केला होता आणि नाटकाचा सराव केला होता. त्यामुळे ते नेहमीच आपला गॉडफादर एकच तो म्हणजे सह्याद्रीचा डोंगर असे सांगतात. सयाजी शिंदे हे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी खूप यश, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. असे असताना देखील त्यांचे पाय आजही आपल्या गावच्या मातीमध्ये रोवलेले आहेत. या झगमगत्या दुनियेत राहत असताना देखील त्यांची गावच्या मातीशी जोडलेली नाळ तुटलेली नाही. ते सध्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी धडपड करत आहेत. ते राज्यभरामध्ये वृक्षारोपण मोहिम राबवत आहेत. त्याचसोबत त्यांनी 'सह्याद्री देवराई' हा उपक्रम हाती घेतला आहे.

या मराठी चित्रपटात केलं काम -

सयाजी शिंदे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेमध्ये नोकरी देखील केली. तब्बल १७ वर्षे त्यांनी बँकेत नोकरी करता करता नाटकं देखील लिहिली. त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, इंग्रजी, मराठी आणि हिंदी या वेगवेगळ्या भाषांच्या नाटकांमध्ये काम केले. यासोबतच त्यांनी मराठी, हिंदी आणि साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. सयाजी शिंदे यांनी 'माझी मानसा', 'अबोली', 'ज्ञानेश्वरी', 'कुंकू झाले वैरी', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी', 'जय महाराष्ट्र', 'लढाई', 'वजीर', 'बोकड', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा', 'ढोलकी', 'बाबांची शाला', 'शूर आम्ही सरदार', 'भिकारी', 'लव्ह बेटिंग' आणि 'तांडव' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sayaji Shinde
Jackie Shroff Birthday: चाळीतला जग्गुभाई कसा बनला जॅकी श्रॉफ?, जाणून घ्या अभिनेत्याचा प्रवास...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com