Saie Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

'भक्षक'च्या यशानंतर Sai Tamhankar जोरात, ओटीटीवरील नव्या वेबसीरिजमध्ये झळकणार

Dabba Cartel Web Series: सई ताम्हणकर लवकरच एका नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या ओटीटीवर सईचीच हवा असल्याचे पाहायला मिळत आहे.

Priya More

Sai Tamhankar Web Series:

मराठी सिनेसृष्टीची 'बिनधास्त गर्ल' अर्थात अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Saie Tamhankar) 'भक्षक' चित्रपटाला (Bhakshak Movie) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील सई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. भक्षकच्या यशानंतर आता सई ताम्हणकरच्या हाती आणखी एक प्रोजेक्ट आला आहे. ओटीटीवर सध्या सई ताम्हकरचीच हवा पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकर लवकरच एका नव्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि फिल्ममेकर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिबानी दांडेकर नेटफ्लिक्सवर एक नवी कोरी वेब सीरिज घेऊन येत आहेत. 'डब्बा कार्टेल'(Dabba Cartel) असं या आगामी वेब सीरिजचं नाव असून अलीकडेच याचा फर्स्ट लूक समोर आला. 'डब्बा कार्टेल' ही मल्टीस्टारर सीरिज असणार असून त्यामध्ये सई ताम्हणकरही दिसणार आहे. २०२४ हे वर्ष सईसाठी दमदार ओपनिंग करणार ठरले आहे. भक्षकनंतर आता ती या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या वेब सीरिजची पहिली झलक सई ताम्हणकरने सोशल मीडिया शेअर केली आहे.

डब्बा कार्टेलची कहाणी ड्रग्जचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची आहे. या वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकर व्यतिरिक्त बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा अनेक बड्या कलाकारांची फौज बघायला मिळणार आहे. सई आता पुन्हा एकदा या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी गाजवायला सज्ज झाली आहे.

सईने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या वेबसीरिजचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'आता हा असा डबा आहे की त्याला तुम्ही कधी विसरू शकत नाही.' दरम्यान ही सीरिज कधीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सईच्या या पोस्टवर सीरिजची निर्माती शिबानीसोबत अनेक कलाकारांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

सईने २०२४ या वर्षाची सुरुवातच दणक्यात केली असून बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला ती तयार झाली आहे. वर्षाची सुरुवात तिने मराठी सिनेमा 'श्रीदेवी प्रसन्न'पासून सुरु केली, त्यानंतर तिचा भक्षक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तो सुपरहिट ठरला. आता सई पुन्हा एकदा 'डब्बा कार्टेल'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय. मराठी प्रेक्षकांना सई आकर्षित करुन घेत असताना आता बॉलिवुड मध्ये सई दमदार परफॉर्मन्स करतेय. आता ती नव्या सीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येते त्यामुळे या वर्षात तिच्या चाहत्यांना आणखी किती सरप्राइज मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

SCROLL FOR NEXT