Parineeti Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra: लग्नानंतर परिणीती चोप्राने फिल्म इंडस्ट्री सोडली?, या क्षेत्रात आजमावतेय नशीब

Parineeti Chopra And Raghav Chadha: परिणीती चोप्राने लग्न झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. परिणीती चोप्राने सध्या आपल्या सिंगिंगबाबत खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर परिणीती चोप्राच्या सिंगिगचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

Priya More

Parineeti Chopra Singing Video:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लग्न झाल्यापासून चर्चेत आहे. परिणीती चोप्राने २४ सप्टेंबर २०२३ ला आपचे खासदार राघव चड्ढासोबत (Raghav Chadha) लग्न केले. परिणीती चोप्राच्या लग्नाचे (Parineeti Chopra Wedding) फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

परिणीती चोप्राने लग्न झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. परिणीती चोप्राने सध्या आपल्या सिंगिंगबाबत खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर परिणीती चोप्राच्या सिंगिगचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. नुकताच परिणीती चोप्राचा लाइव्ह सिंगिंग शो झाला. या शोची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती तिच्या आजोबांच्या आवडीची गाणी गाताना दिसत आहे.

परिणीती चोप्राने आपल्या लाइव्ह सिंगिंग शोची क्लिप आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या व्हिडीओला शेअर करत परिणीती चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या आजोबांच्या आवडीची गाणी.' अभिनेत्री या व्हिडीओमध्ये 'आज जाने की जिद ना करो' हे गाणं गाताना दिसत आहे. परिणीतीच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून ते तिचे कौतुक करत आहेत.

एका युजरने या व्हिडिओवर कमेंट्स करत लिहिले की, 'परी तू खूपच छान गात आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'तुझ्या आजोबांना तुला गाताना पाहून खूप चांगले वाटत असेल.' तिसऱ्या युजरने लिहिले की, 'खूपच छान.' अशाप्रकारच्या कमेंट्स करत नेटिझन्स तिच्या सिंगिंगचे कौतुक करत आहेत. परिणीती चोप्राने या लाइव्ह शोच्या माध्यमातून आपल्या सिंगिंग करिअरची सुरूवात केली.

परिणीती चोप्राने आता सिंगिंगमध्ये करिअरला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिने फिल्म इंडस्ट्री तर सोडली नाही ना अशाप्रकारच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे. परिणीतीने चोप्राने सिंगिंगबद्दल बोलताना सांगितले होते की, 'माझा नवरा राघवने मला सिंगिंगसाठी खूपच सपोर्ट केला आहे. तो म्हणाला की मी यावर विश्वास करू शकत नाही की तू एकावेळी दोन करिअर करत आहे. जे आधी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीने केले नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E-Sakal No1 Marathi News: महाराष्ट्रात आम्हालाच वाचकांची पहिली पसंती; डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळ सलग दुसऱ्यांदा ठरला नंबर 1

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT