Chetan Bodke
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि लॉकअप कंटेस्टंट पूनम पांडेचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे.
पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाले आहे. सोशल मीडियावर पूनम पांडेच्या निधनाची पोस्ट व्हायरल होत आहे.
पूनम पांडे कायमच तिच्या फॅशनमुळे आणि तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधायची.
पूनम पांडेचा जन्म ११ मार्च २०२३ रोजी नवी दिल्लीत झाला असून तिचं शिक्षणही दिल्लीतच झालं होतं.
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'नशा' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
याशिवाय तिने 'लव्ह इज पॉयझन', 'मालिनी एन्ड कंपनी, द विकेंड', 'आ गया हिरो', 'द जर्नी ऑफ कर्मा' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
पूनम पांडेने कंगना रनौतच्या 'लॉकअप' शोमध्येही सहभाग घेतला होता.
पूनम पांडे कायमच आपल्या कातील अंदाजातील फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहायची.
अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन इतका चाहतावर्ग आहे.