Heeramandi The Diamond Bazaar Trailer Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

भव्य दिव्यता, राजेशाही थाट, रोमान्स अन् ड्रामा... संजय लील भन्साळी यांच्या ‘Heeramandi’ सीरिजचा थक्क करणारा Trailer Out

Heeramandi: The Diamond Bazaar Trailer Out: बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामाने सर्वांचेच लक्ष वेधले.

Chetan Bodke

Heeramandi: The Diamond Bazaar Trailer Out

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या त्यांची आगामी वेबसीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ (Heeramandi: The Diamond Bazaar) मुळे चर्चेत आहेत. या वेबसीरिजबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे. टीझर आणि वेबसीरीजमधलं गाणं रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला या वेबसीरीजचा ट्रेलर आलेला आहे. या वेबसीरीजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना भव्य दिव्यता, रोमान्स आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. सर्वच पात्रांच्या लूकने सर्वांचेच मन जिंकले. (OTT)

हा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये, पाकिस्तानातील हिरामंडी या परिसरातील कथेवर ही सीरीज आहे. सेटवरील भव्य दिव्यता, कथेमध्ये रोमान्स आणि ड्रामा सोबतच स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर या वेबसीरीजचे कथानक आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची जीवनशैली आणि देशाच्या स्वातंत्र्यादरम्यानचा त्यांचा संघर्ष संजय लीला भन्साळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. (Web Series)

सीरिजच्या ट्रेलरची सुरुवात, "सिर्फ घुंघरू पहन लेने से औरत तवायफ नही होती…, दिन के और रात के सारे हुनर सिखने पडते है…" या डायलॉगने होते. ट्रेलरमध्ये, राजवाड्याची भव्य दिव्यता, रोमान्स आणि राजकारणसह अनेक पैलू पाहायला मिळतील.

मल्लिकाजान (मनिषा कोईराला) वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची प्रमुख असते. हिरामंडीमध्ये कोणतीही भिती न बाळगता तिची राजवट चालवते. पण एक दिवशी तिच्या जुन्या शत्रूची मुलगी फरीदानच्या (सोनाक्षी सिन्हा) येण्याने घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. मग पुढे काय होतं ?, हे आपल्याला ट्रेलर पाहिल्यावरच कळेल. सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला आहे. आता चाहते सीरिजच्या प्रतीक्षेत आहेत. (Bollywood News)

'हीरामंडी'ची स्टारकास्टही बरीच मोठी आहे. या सीरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, अध्यायन सुमन, शेखर सुमन, फरदीन खान, संजीदा शेख आणि ताहा शाह बदुशा प्रमुख भूमिकेत आहे. 'हीरमंडी : डायमंड बझार' ही सीरिज येत्या १ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत. नेटफ्लिक्सवरील ही अत्यंत महागड्या वेबसीरिजपैकी एक वेबसीरीज असल्याचं बोललं जात आहे. (Bollywood Actress)

‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात साकारलेल्या, सेटप्रमाणेच भव्य दिव्य सेट पाहायला मिळणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून दिग्दर्शक या वेबसीरिजवर काम करत आहेत. एका वेगळ्याच विषयावर आधारित, महत्त्वकांक्षी, भव्य सीरिज पैकी एक असलेल्या ह्या सीरीजसाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT