Cinematographer Gururaj  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gururaj Jois: बॉलिवूडमधल्या पडद्यामागचा 'चेहरा' हरपला; 'लगान'च्या सिनेमॅटोग्राफरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Lagan Movie Cinematographer Gururaj Jois: बंगळुरू येथे २७ नोव्हेंबरला हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. गुरूराज जोइस यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर (Bollywood) शोककळा पसरली आहे.

Priya More

Cinematographer Gururaj Jois Passed Away:

हिंदी सिनेसृष्टीतून (Hindi Film Industrey) एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध जेष्ठ सिनेमॅटोग्राफर गुरूराज जोइस (Cinematographer Gururaj Jois) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरू येथे २७ नोव्हेंबरला त्यांना हृदविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

गुरूराज जोइस यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर (Bollywood) शोककळा पसरली आहे. गुरूराज जोइस यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

गुरूराज जोइस हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठे नाव आहे. ते प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर होते. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. आमिर खानच्या लगान चित्रपटासह त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी काम केले आहे. अप्रतिम कॅमेरा वर्कसाठी ते ओळखले जात होते. गुरूराज जोइस यांच्या निधनाचे वृ्त्त कळताच आमिर खानच्या आमिर खान प्रोडक्शनकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आमिर खानने या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, गुरूराज जोइस यांच्या निधनाने अतिशय दु:ख होत आहे. ते एकदम पॅशनेट व्यक्ती होते. ज्यांनी कॅमेऱ्यामागील कामाने 'लगान'ला जीवंत केलं होतं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.' आमिर खानसोबत इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत गुरूराज जोइस यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, गुरूराज जोईस यांनी सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. गुरुराज यांनी 'मुंबई से आया मेरा दोस्त', 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'मिशन इस्तंबूल', 'एक अजनबी', 'जंजीर' आणि 'गली गली चोर है' या चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

चिनी लोकांचे डोळे लहान का असतात? कारण एकालाही माहित नाही

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

SCROLL FOR NEXT