Crew Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Crew Box Office Collection Day 7: बॉक्स ऑफिससह जगभरात 'क्रू' सुसाट, 7 दिवसांत केली छप्परफाड कमाई

Crew Worldwide Box Office Collection Day 7: पहिल्या आठवड्यात क्रू चित्रपटाला चांगला फायदा झाला. आता हळूहळू हा चित्रपट चांगला वेग पकडत आहे. फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर वर्ल्डवाइड देखील हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

Priya More

Crew Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Senon) आणि तब्बू स्टारर 'क्रू' चित्रपटाने (Crew Movie) बॉक्स ऑफिसवर पुन्हा वेग पकडला आहे. या चित्रपटाने आता रॉकेटचा स्पीड पकडला आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगली पसंती मिळत आहे. या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली. पहिल्या आठवड्यात क्रू चित्रपटाला चांगला फायदा झाला. आता हळूहळू हा चित्रपट चांगला वेग पकडत आहे. फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर वर्ल्डवाइड देखील हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या सातव्या दिवसाची कमाई (Crew Box Office Collection Day 7) समोर आली आहे.

क्रू चित्रपटामध्ये करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. या तिघींच्याही अभिनयावर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच हा चित्रपट देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी सोडत नाही. या चित्रपटाने मार्केटमध्ये आपली पकड धरून ठेवली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांच्या 'क्रू' चित्रपटाने 9.25 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9.75 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 10.5 कोटी, चौथ्या दिवशी 4.2 कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी 3.57 कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी 3.3 कोटीची कमाई केली. आता सातव्या दिवशी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सातव्या दिवशी चित्रपटाने 3 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 43.75 कोटींची कमाई केली.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा 'क्रू' चित्रपट जगभरात देखील चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरामध्ये आतापर्यंत 82.58 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल. 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहचण्यासाठी या चित्रपटाला 17 कोटींपेक्षा जास्त कमाई करावी लागेल.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट 'क्रू' 29 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात या तिन्ही अभिनेत्रींव्यतिरिक्त दिलजीत दोसांझ, राजेश शर्मा, सास्वत चॅटर्जी यांसारख्या स्टार्सनीही काम केले आहे. कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्माही या चित्रपटाचा एक भाग आहे. याची निर्मिती रिया कपूर, एकता कपूर, अनिल कपूर आणि दिग्विजय पुरोहित यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश ए कृष्णन यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT