What The Hell Navya Season 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan: मूर्ख आहेत त्या मुली ज्या डेटवर गेल्यावर...', जरा स्पष्टपणेच बोलल्या जया बच्चन

What The Hell Navya Season 2: नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट 'व्हाट दे हेल नव्या 2'मध्ये जया बच्चन या स्पष्टपणे बोलल्या आहेत. या एपिसोडमध्ये नव्या आपली आई श्वेता बच्चन नंदा, आजी जया बच्चन आणि भाऊ अगस्त्यसोबत मॉर्डन पुरुषांच्या विषयावर बोलताना दिसत आहेत.

Priya More

Jaya Bachchan Video:

बॉलिवूडच्या (Bollywood) ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत ज्या कोणत्याही विषयावर आपले मत स्पष्टपणे मांडतात. एखाद्या गोष्टीवर मत मांडताना त्या मागेपुढे पाहत नाही. स्पष्टवक्तेपणासाठी त्या खूपच चर्चेत असतात. यासाठी रोषाला सामोरे जावे लागले तरी चालेल पण त्या न घाबरता बोलताना दिसतात. नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट 'व्हाट दे हेल नव्या 2'मध्ये जया बच्चन या स्पष्टपणे बोलल्या आहेत. या एपिसोडमध्ये नव्या आपली आई श्वेता बच्चन नंदा, आजी जया बच्चन आणि भाऊ अगस्त्यसोबत मॉर्डन पुरुषांच्या विषयावर बोलताना दिसत आहेत. यावेळी जया बच्चन यांनी सांगितले की, 'त्या मुली मूर्ख असतात ज्या डेटवर जाऊन अर्धे-अर्धे करून बिल भरतात. फक्त पुरुषांनीच बिल भरावे.'

या शोमध्ये नव्या नवेली नंदा यांनी स्त्रीवादावर भाष्य केले आणि महिलांना आता अधिक सक्षम वाटत असल्याचे सांगितले. तिला अनेक गोष्टी स्वतंत्रपणे करायच्या आहेत. त्यानंतर तिने उदाहरण दिले की, जर तुम्ही एखाद्या मुलीला डेटवर घेऊन जाता आणि म्हणता की तू बिल भर. तर काही लोकं त्यामुळे नाराज होतात. कारण महिलांना वाटते की, त्या पण समानरुपाने याचे भागीदार आहेत. पण नव्याने काही बोलण्याआधीच जया बच्चन म्हणाल्या की, ज्या महिला हे करतात त्या मूर्ख आहेत. जया बच्चन नव्याला सांगतात की, 'किती मूर्ख आहेत त्या महिला ज्या डेटवर गेल्यानंतर बिल अर्धे-अर्धे करायला लावतात. त्यापेक्षा पुरुषांना बिल भरण्याची मुभा द्यावी.'

यानंतर नव्याने आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांना विचारले की, त्यांच्या काळातल्या आणि आजच्या काळातील पुरुषांमध्ये काही बदल झाला आहे का? म्हणजे त्यांच्या काळात ते कसे होते आणि आज कसे आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना श्वेता बच्चन नंदा म्हणाली की, 'आमच्या काळात नेहमी असे म्हटले जायचे की एका पुरूषाला नेहमी मजबूत राहिले पाहिजे आणि गप्प राहिले पाहिजे. इतपर्यंत की जर तुम्ही डेटिंग करत असाल तरी देखील तुम्ही पुरूषाचीच वाट पाहा. तोच तुमच्याकडे येईल आणि प्रपोज करेल.' तर जया बच्चन यांनी हे मान्य केले आणि त्या म्हणाल्या की, 'पुरुषाने आधी प्रपोज केले तर बरे होईल. नाही तर खूप विचित्र वाटेल.'

यावेळी नव्याने तिच्या पॉडकास्ट शोमध्ये भाऊ अगस्त्य नंदालाही आमंत्रित केले होते. नुकतेच त्याने 'द आर्चीज' चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नव्या नवेलीच्या पॉडकास्ट शोमधील बहुतांश मुद्दे महिलांशी संबंधित असल्याची माहिती आहे. नव्याने भाऊ अगस्त्य नंदाबद्दल खुलासा केला की, तो खूप संवेदनशील आहे आणि रडायला लागतो. किंबहुना उघडपणे रडण्यातही त्याला संकोच वाटत नाही. अगस्त्यने महिला आणि मुलींबाबत पुरुषांच्या कृतीवरही मत व्यक्त केले. त्याने सांगितले की, 'कोणत्याही कृतीमागे तुमचा हेतू महत्त्वाचा असतो. जर पुरुषाने महिलांसाठी दयाळूपणे दार उघडले तर ते चांगले आहे. पण आपण श्रेष्ठ आहोत या उद्देशाने तो दार उघडत असेल तर अडचण येते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT