Article 370 Review: सत्य घटनेवर आधारित 'आर्टिकल 370' ला प्रेक्षकांची पसंती, यामी गौतम आणि प्रियमणीने भूमिकेला दिला न्याय

Article 370 Movie Review in Marathi: 'आर्टिकल 370' चित्रपट आज रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरने सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाला रिलीज झाल्यानंतरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील यामी गौतमीचा दमदार अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला.
Article 370 Movie Review in Marathi
Article 370 Movie Review in MarathiSaam Digital
Published On

Article 370 Movie Review:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमचा 'आर्टिकल 370' चित्रपट (Article 370 Movie) आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज त्यांची प्रतीक्षा संपली. 'आर्टिकल 370' चित्रपट आज रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरने सोशल मीडियावर चांगला धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाला रिलीज झाल्यानंतरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील यामी गौतमीचा (Yami Gautam) दमदार अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्यासंख्येने गर्दी करत आहेत.

'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या आदित्य धरने सत्य घटनेवर आधारित 'आर्टिकल 370' हा आणखी एक चित्रपट तयार केला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या घटना सर्वसामान्यांना चांगलीच माहीत आहेत. पण अर्टिकल 370 हटवण्यापूर्वी काय तयारी केली होती हे सर्व या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट जम्मू-काश्मीरमधून र्टिकल 370 रद्द करण्याच्या आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही राज्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या सर्वोच्च गुप्त निर्णयावर आधारित आहे.

चित्रपटाची कथा जुनी हक्सर या गुप्तचर अधिकाऱ्यापासून सुरू होते. जुनी हक्सरला दहशतवादी संघटनेचा तरुण कमांडर बुरहान वानीचा ठावठिकाणा कळतो आणि त्याला चकमकीत ठार केले जाते. या घटनेमुळे काश्मीरमध्ये दगडफेक सुरू होते आणि या घटनेला जुनी हक्सर जबाबदार मानून त्यांची दिल्लीत बदली करण्यात येते. जेव्हा सरकारने अर्टिकल 370 रद्द करण्याच्या दिशेने वाटचाल केली. PMO सचिव राजेश्वरी स्वामीनाथन यांनी स्वतःची टीम तयार केली आणि काश्मीरमधील NIA ऑपरेशनचे नेतृत्व करण्यासाठी जुनी हक्सरची नियुक्ती केली. हक्सर खोऱ्यात शांतता आणि एकता राखण्यासाठी तिच्या प्रवासात भ्रष्ट स्थानिक नेते आणि अतिरेक्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांमधून जुनी प्रवास करते.

या चित्रपटाची कथा सहा प्रकरणांमध्ये विभागली गेली असून त्यातील पहिल्या प्रकरणाची सुरुवात दहशतवादी संघटनेचा तरुण कमांडर बुरहान वानी याच्या कथेपासून होते. 2016 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी निषेध आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पीएमओ सचिव राजेश्वरी स्वामीनाथन यांनी कारवाई केली. यानंतर ही कथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापर्यंत पोहोचते. यानंतरही परिस्थिती फारशी बदलत नाही आणि 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला होतो. त्यानंतर केंद्र सरकारने कारवाई करत जम्मू-काश्मीरसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा निर्णय घेतला.

Article 370 Movie Review in Marathi
माझ्या खोटं बोलण्याचा कोणाला फायदा होत असेल तर..., मृत्यूच्या अफवेनंतर Poonam Pandey ने माध्यमांना दिली पहिली प्रतिक्रिया

अर्टिकल 370 हटवण्याआधी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यघटनेची तपासणी कशी केली आणि अर्टिकल 370 रद्द करण्यात मदत करणाऱ्या त्रुटी ओळखल्या यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. जुन्या सरकारी लायब्ररीतून जप्त केलेल्या 1954, 1958 आणि 1965 च्या दस्तावेजांमध्ये महत्त्वाचे दस्तावेज वगळण्यात आल्या आहेत. ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधून अर्टिकल 370 खूप आधी काढून टाकण्यात आले असते. मोनल ठाकूरसह आदित्य धर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे चित्रपटाच्या कथेतून देशभक्तीच्या उदात्त भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी ठरला आहे.

Article 370 Movie Review in Marathi
Hemangi Kavi Trolled: आग लागूदे अशा फॅशनला..., 'झी रिश्ते अवॉर्ड्स'मधील लुकमुळे हेमांगी कवी होतेय ट्रोल

चित्रपटाची कथा मुख्यतः जुनी हुस्कर आणि पीएमओ सचिव राजेश्वरी स्वामीनाथन या दोन पात्रांभोवती फिरते. जुनी हुस्करच्या भूमिकेत यामी गौतम आणि पीएमओ सेक्रेटरी राजेश्वरी स्वामीनाथनच्या भूमिकेत प्रियमणी यांनी चित्रपटात जबरदस्त अभिनय केला आहे. पंतप्रधान म्हणून अरुण गोविल आणि गृहमंत्री म्हणून किरण करमरकर यांच्या भूमिका अतिशय प्रभावी आहेत. चित्रपटातील उर्वरित कलाकार राज जुत्शी, सुमित कौल, वैभव तत्ववादी, स्कंदा ठाकूर आणि इरावती हर्षे यांनी आपापल्या भूमिकांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची छायांकन, रचना आणि पार्श्वभूमी खूपच चांगली आहे.

Article 370 Movie Review in Marathi
'Yodha'मधील 'जिंदगी तेरे नाम' गाण्याचा टीझर आऊट, Rashi Khanna आणि Sidharth Malhotra ची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com