माझ्या खोटं बोलण्याचा कोणाला फायदा होत असेल तर..., मृत्यूच्या अफवेनंतर Poonam Pandey ने माध्यमांना दिली पहिली प्रतिक्रिया

Poonam Pandey Viral Video: पूनम पांडेच्या या कृत्यावर अनेकांनी संपात व्यक्त करत तिला ट्रोल केले होते. यासोबतच तिच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल देखील करण्यात आली होती.
Poonam Pandey
Poonam PandeySaam Tv
Published On

Poonam Pandey First Reaction:

बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:च्याच निधनाची अफवा पसरवली होती. त्यानंतर तिने स्वत:च व्हिडीओ पोस्ट करत आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. हे सर्व गर्भाशयाच्या तोडांच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी केले असल्याचे पूनम पांडेने सांगितले होते. पूनम पांडेच्या या कृत्यावर अनेकांनी संपात व्यक्त करत तिला ट्रोल केले होते. यासोबतच तिच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल देखील करण्यात आली होती. अशामध्ये आता पूनम पांडेने पहिल्यांदाच मीडियासमोर येत यासंपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे.

निधनाची खोटी बातमी पसरवल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच पूनम पांडे सार्वजनिक ठिकाणी दिसली. पूनम पांडेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण नेहमी वेस्टर्न लूक आणि विचित्र ड्रेसमध्ये दिसणारी पूनम पांडे देसी लूकमध्ये दिसली. तिचा हा देसी लूक पाहून सर्वजण चकीत झाले. पूनम पांडेने गुरुवारी मुंबईतल्या अंधेरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. पूनम पांडेचा यावेळीचा पारंपारिक लूक पाहून सर्वजण चकीत झाले. पूनम पांडेने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. मृत्यूच्या अफवेनंतर पूनम पांडे पहिल्यांदाच घराबाहेर पडली आणि तिने माध्यमांशी संवाद साधला.

पूनम पांडेने यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'तुम्ही सगळ्यांनी या जगामध्ये कधी खोटं बोलले नाही का? आणि जर माझ्या खोटं बोलण्याने कोणाचा फायदा होत असेल तर असं खोटं मी हजार वेळा बोलेल. जी लोकं माझ्याबद्दल जे काही बोलले आहे त्यांच्यामधील एकाही व्यक्तीने गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल कधीच काही बोलले नाही. जेव्हा मी गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी काही तरी करत आहे तर आज या सर्वांना प्रॉब्लेम आहे. माझ्या चाहत्यांची मी मनापासून माफी मागते.' पूनम पांडेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, मंदिरामध्ये जाणाऱ्या पूनम पांडेला पाहून पापाराझींनी तिला प्रश्न विचारले. एका फोटोग्राफरने पूनमला विचारले की, 'कशी आहेस?', त्यावर तिने हसून उत्तर दिले, 'एकदम फर्स्ट क्लास!' तेव्हा पापाराझींनी मस्करीमध्ये तिला म्हटले, 'तू आम्हाला घाबरवले.' तेव्हा पूनमने हसत-हसत उत्तर दिले की, 'तू घाबरला होतास, मी अजिबात घाबरले नाही.' त्यानंतर ती पापाराझींना सांगते मी दर्शनासाठी आली आहे आणि ती मंदिरामध्ये निघून जाते. पूनमने मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि पूजा केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचा गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची खोटी बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण २४ तासांतच पूनम पांडेने ती जिवंत असल्याचे उघड केले होते.

Poonam Pandey
Hemangi Kavi: आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की..., 'बेस्ट माँ' अवॉर्ड मिळाल्यानंतर हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com