Hemangi Kavi
Hemangi Kavi Instagram @hemangiikavi

Hemangi Kavi: आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की..., 'बेस्ट माँ' अवॉर्ड मिळाल्यानंतर हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना

Zee Rishtey Awards 2024: नुकताच पार पडलेल्या 'झी रिश्ते अवॉर्ड २०२४'मध्ये (Zee Ristey Award 2024) हेमांगी कवीचा बोलबोला पाहायला मिळाला हेमांगी कवीला 'बेस्ट माँ' म्हणजेच सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Published on

Hemangi Kavi Video:

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या चर्चेत आली आहे. हेमांगी कवी फक्त मराठी मनोरंजन क्षेत्रात नाही तर हिंदीमध्ये देखील उत्तम काम करत आहे. एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका ती साकारत आहे. हेमांगी सध्या झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ (Kaise Mujhe Tum Mil Gayi Serial) या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमध्ये हेमांगी कवी भवानी चिटणीसची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे.

अशामध्ये हेमांगी कवीला या मालिकेतील उत्कृष्ट कामाची पोचपावती मिळाली आहे. नुकताच पार पडलेल्या 'झी रिश्ते अवॉर्ड २०२४'मध्ये (Zee Ristey Award 2024) हेमांगी कवीचा बोलबोला पाहायला मिळाला हेमांगी कवीला 'बेस्ट माँ' म्हणजेच सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर हेमांगी कवीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हेमांगी कवीन देखील हा पुरस्कार मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेमांगी कवीला झी रिश्ते पुरस्कार २०२४ सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ हेमांगी कवीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुरस्कारासाठी हेमांगी कवीच्या नावाची घोषणा करण्यात आली त्यावेळी तिला आश्चर्याचा धक्का बसतो. यावेळी किशोरी शहाणे तिला घट्ट मिठी मारतात. त्यानंतर ती मंचावर जाऊन हा पुरस्कार स्वीकारते. यावेळी ती आपल्या भावना देखील व्यक्त करते. हेमांगी कवी यावेळी म्हणते की, ' आई गं.. मला खरंच वाटलं नव्हतं की मी सर्वोत्कृष्ट आई होऊ शकते आणि हा अवॉर्ड मला मिळू शकतो. आणि जेव्हा... मला माफ करा मी मराठीत बोलले.', असे म्हणते. त्यावेळी समोरुन जय महाराष्ट्र अशी घोषणा ऐकू येते. यावेळी हेमांगी कवीला या मंचावर मराठीमध्येच बोलण्याचा आग्रह केला जातो.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर हेमांगी कवीने इन्स्टावर व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'काल मातृभाषदिन होता आणि कालच मला झी रिश्ते अवॅार्डस् २०२४ मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला! माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली.'

Hemangi Kavi
Poonam Pandey: स्वत:च्या निधनाच्या खोट्या अफवेनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली पूनम पांडे, देसी लूकमध्ये मंदिरात केली पूजा; VIDEO व्हायरल

'ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं! त्यानंतर ज्या प्रकारे @arjunbijlani आणि @haarshlimbachiyaa30 ने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं! आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो! आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय! जय महाराष्ट्र!' सध्या हेमांगी कवीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांनी तिचे खूपच कौतुक केले आहे.

Hemangi Kavi
Bhagyashree Birthday: सांगलीची राजकन्या ते बॉलिवूड स्टार... कुटुंबियांच्या विरोधामुळे राजवैभवाचा त्याग करुन केलं लग्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com