Bhagyashree Birthday: सांगलीची राजकन्या ते बॉलिवूड स्टार... कुटुंबियांच्या विरोधामुळे राजवैभवाचा त्याग करुन केलं लग्न

Bhagyashree Movie: सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून भाग्यश्रीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. भाग्यश्रीच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल ती सांगलीच्या घराण्याची राजकन्या आहे.
Bhagyashree
BhagyashreeSaam Tv
Published On

Bhagyashree Lovestory:

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. भाग्यश्रीवर सध्या चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाग्यश्री बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर परतली आहे. ती शेवटी सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाच्या माध्यमातून भाग्यश्रीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. भाग्यश्रीच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल ती सांगलीच्या घराण्याची राजकन्या आहे. भाग्यश्रीचा जन्म मुंबईमध्ये माधवराव आणि राज्यलक्ष्मी यांच्या घरी झाला. भाग्यश्री पटवर्धन या नावाने जन्मलेली ही अभिनेत्री महाराष्ट्रातील राजेशाही घराण्यातून येते हे खूप कमी लोकांना माहिती आहे. भाग्यश्रीच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आयुष्याशीसंबंधित न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत...

भाग्यश्रीचे वडील विजयसिंगराव माधवराव पटवर्धन आजही ‘सांगलीचा राजा’ म्हणून राज्य करतात. राजघराण्यातील असूनही भाग्यश्रीने अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले. पहिल्याच चित्रपटातून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. भाग्यश्रीचा पहिल्या चित्रपट 'मैने प्यार किया' सुपरहिट ठरला. फार कमी लोकांना माहित असेल की या चित्रपटातून स्टार बनलेल्या भाग्यश्रीने १९९० मध्ये तिचा जुना मित्र हिमालय दासानीशी लग्न केले. भाग्यश्रीच्या घरच्यांचा या लग्नाला कडाडून विरोध असला तरी अभिनेत्रीने मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. भाग्यश्रीने घरातून पळून जाऊन हिमालय दसानीशी लग्न केले.

पहिल्याच चित्रपटातून चांगली प्रसिद्धी मिळून देखील भाग्यश्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवू शकली नाही. चाहत्यांना भाग्यश्रीचे अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळाली नाही. कारण तिने लग्नानंतर चित्रपटांपासून स्वतःला दूर केले. 'मैने प्यार किया'च्या यशानंतर भाग्यश्रीला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मात्र त्या सर्व ऑफर्स तिने नाकारल्या. तिने गृहिणी होण्याचा निर्णय घेतला. एकदा 'मैने प्यार किया' चित्रपटादरम्यान भाग्यश्री तिचा को-स्टार सलमान खानला मिठी मारून रडू लागली. जेव्हा तिला याचे कारण विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, 'मी रूढिवादी कुटुंबातून आली आहे आणि काही दृश्यांमध्ये मी कम्फर्टेबल नाही.'

'मैने प्यार किया'चे दिग्दर्शक सूरज बडजात्याच्या म्हणण्यानुसार, चित्रपटात एक किसिंग सीन द्यायचा होता. पण दोन्ही स्टार्सनी हा सीन शूट करण्यास नकार दिला. त्यामुळे दिग्दर्शकाला तो सीन चित्रपटातून काढून टाकावा लागला. भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांनीही अभिनयात हात आजमावला आणि दोघांनीही 'त्यागी', 'कैद में बुलबुल' आणि 'पायल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले असले तरी हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. भाग्यश्रीचा पती हिमालय दसानी याला २०१९ मध्ये जुगाराचे रॅकेट चालवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. भाग्यश्रीचा एक मुलगा आणि मुलगी आहे. तिचा मुलगा अभिमन्यू देखील अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाग्यश्रीला अभिमन्यूला मोठा अभिनेता बनवायचे आहे.

Bhagyashree
Gautami Patil: गौतमी पाटीलचं खरं नाव आहे वेगळंच, स्वत:च सांगितलं; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com