मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सध्या ट्रोल होत आहे. हेमांगी कवीला नुकताच पार पडलेल्या 'झी रिश्ते अवॉर्ड २०२४'मध्ये (Zee Ristey Award 2024) 'बेस्ट माँ' म्हणजेच सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये हेमांगी कवीने पारंपारिक लूक म्हणजेच साडीमध्ये हजेरी लावली. पण हेमांगी कवीचा हा लूक नेटिझन्सला अजिबात आवडला नाही. या लूकवरून नेटिझन्स हेमांगी कवीला ट्रोल करत आहेत. नेटिझन्सनी यावेळी हेमांगी कवीला संस्कृतीचे धडे शिकवले आहेत.
हेमांगी कवीला 'झी रिश्ते पुरस्कार २०२४' सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी हेमांगी कवीने खास लूक केला होता हेमांगी कवीने काळ्या रंगाची काठपदराची साडी नेसली होती. हेमांगी कवीची साडी खूपच सुंदर होती. पण तिने या साडीवर जो ब्लाऊज परिधान केला होता तो नेटिझन्सला अजिबात आवडला नाही. हेमांगी कवीने या साडीवर डीप नेक ब्लेझर टाईप ब्लाऊज परिधान केला होता. हेमांगीने साडीचा पदर खांद्यावर न घेता तो कमरेला बांधला होता. तसंच तिने गळ्यामध्ये ऑक्साइड ट्रेडिशनल ज्वेलरी घातली होती. त्याचसोबत तिने नाकामध्ये नथ आणि कपाळावर टिकली लावली होती.
या अवॉर्ड सोहळ्याला पोहचेल्या हेमांगी कवीने माध्यमांसमोर फोटो काढताना जबरदस्त पोझ दिल्या. हेमांगी कवीचा या अवॉर्ड शोमधील लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेमांगी कवीला नेटिझन्सने ट्रोल करत तिला संस्कतीचे धडे दिले आहेत. काही युजरने कमेंट्स करत लिहिले की, 'ही कोणती फॅशन', 'साडी आपला पवित्र पोषाख आहे याला तुम्ही लोकं घाणेरडं करत आहात', 'मराठी संस्कृती आहे का ही?', 'साडीची चेष्टा करून ठेवली आहे या लोकांनी',
तर काही युजर्सने असे लिहिले की, 'किती सुंदर साडी आहे ही. साडीसारखीच नेसली असतील तर सुंदर दिसली असती', 'असली संस्कृती नकोय आम्हाला', 'आग लागूदे अशा फॅशनला', 'साडी नेसण्याची ही कोणती पद्धत आहे', 'काही तरी नवा ट्रेंड सेट करण्याच्या नादात संस्कृती विसरून गेली', 'ही कोणती अदा आहे', 'साडीचा अपमान आहे हा' अशाप्रकारच्या कमेंट्स करत नेटिझन्सनी हेमांगी कवीची चांगलीच शाळा घेतली आहे.
दरम्यान, हेमांगी कवी सध्या झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ (Kaise Mujhe Tum Mil Gayi Serial) या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमध्ये हेमांगी कवी भवानी चिटणीसची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये हेमांगी कवीला या मालिकेतील उत्कृष्ट कामाची पोचपावती मिळाली आहे. हेमांगी कवीला 'बेस्ट माँ'चा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर हेमांगी कवीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.