Fighter Film Collection  Instagram
मनोरंजन बातम्या

Fighter Collection: हृतिक रोशनचा फायटर सुसाट, बॉक्स ऑफिससह जगभरात 360 कोटींचा गल्ला केला पार

Fighter Worldwide Collection: या चित्रपटाची फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. फायटरच्या कमाईचा आकडा वाढत चालला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये आतापर्यंत बक्कळ कमाई केली आहे.

Priya More

Fighter Box Office Collection :

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukone) स्टारर 'फायटर' चित्रपटाची (Fighter Film) बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाची फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. फायटरच्या कमाईचा आकडा वाढत चालला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये आतापर्यंत बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 360 कोटींचा गल्ला जमा केला आहे.

सिद्धार्थ आनंदच्या फायटरने अलीकडेच चित्रपटामध्ये महिनाभराचा कालावधी पूर्ण केला आहे. हा चित्रपट अजूनही मोठ्या दिमाखात चित्रपटगृहात सुरू आहे. 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून फायटरला ओळख मिळाली. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर या चित्रपटाने जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 360 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाची कमाई अजूनही सुरू आहे. येत्या काळामध्ये देखील हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

जगभरातील 360 कोटी ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून, चित्रपटाने देशांतर्गत बाजारातून 259 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर विदेशी बॉक्स ऑफिसमध्ये सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाने 101 कोटींहून अधिक कमाई केली आहे. इन्स्टाग्रामवर Marflix Pictures ने चित्रपटाच्या कमाईचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक अजूनही चित्रपटगृहामध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

फायटरच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. फायटरमध्ये ऋषभ साहनीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी या सर्व स्टारकास्टने तगडे मानधन घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT