Fighter Film Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

बिग बजेट सिनेमा आणि तगडी स्टारगास्ट असतनाही 'Fighter' पडला मागे, २०० कोटीपर्यंत पोहचण्यातही मिळालं नाही यश

Fighter Collection: दोन आठवड्यात फायटरला २०० कोटींची कमाई करण्यातही यश आले नाही. बिग बजेट चित्रपट, तगडी स्टारकास्ट असताना देखील फायटर बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत मागे पडला आहे.

Priya More

Fighter Box Office Collection Day 14:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोन (Deepika Padukone) स्टारर 'फायटर' चित्रपट (Fighter Film) प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. पण त्यानंतर फायटरच्या कमाईमध्ये वारंवार चढउतार पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यात फायटरला २०० कोटींची कमाई करण्यातही यश आले नाही. बिग बजेट चित्रपट, तगडी स्टारकास्ट असताना देखील फायटर बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत मागे पडला आहे. २०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी फायटरचे प्रयत्न सुरू आहेत.

'पठान' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद 'फायटर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. या चित्रपटाबाबत त्यांनी मोठे दावेही केले होते. मात्र ते प्रेक्षकांना आकर्षित करू शकले नाही. फायटर गेल्या काही दिवसांपासून २०० कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपट २०० कोटींजवळ पोहचला आहे. पण हा आकडा पार करण्यात त्याला यश आले नाही. या चित्रपटाच्या कमाईमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. विकेंडला हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. पण इतर दिवशी कमाईच्या आकड्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या फायटरने बॉक्स ऑफिसवर जवळपास 22 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, दुसऱ्या दिवशी कलेक्शन किंचित वाढून 39 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. परंतु तिसऱ्या दिवशी ते 27 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. रविवारीही या चित्रपटाने फक्त २९ कोटींची कमाई केली. फायटरच्या दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शनवर नजर टाकल्यास, सोमवारी या चित्रपटाने 3.25 कोटी रुपयांची कमाई केली. मंगळवारी 3.25 कोटी, बुधवारी कलेक्शनमध्ये घट झाली. या चित्रपटाने 7 फेब्रुवारी रोजी देशभरात सुमारे 2.75 कोटी रुपयांची कमाई केली. यासोबतच रिलीजच्या 14 दिवसांत 'फायटर'ने फक्त 184.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

फायटरच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत अनिल कपूर, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. फायटरमध्ये ऋषभ साहनीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी या सर्व स्टारकास्टने तगडे मानधन घेतले आहे. बिग बजेट सिनेमा असताना देखील फायटरला चांगली कमाई करण्यात यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT