Poonam Pandey: पूनम पांडे पुन्हा पडली तोंडघशी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तिचा दावा फेटाळला

Cervical Cancer Awareness Campaign Ambassador: पूनम पांडेने दावा केला की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी तिला ब्रँड ॲम्बेसेडर बनवणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Union Ministry of Health) आणि माझ्या टीममध्ये सध्या चर्चा सुरू आहे.
Poonam Pandey
Poonam PandeySaam Tv
Published On

Poonam Pandey Dies Fake News:

स्वत:च्याच मृत्यूची अफवा पसरवणारी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चांगलीच चर्चेत आहे. पूनम पांडेवर सध्या जोरदार टीक होत आहे. याप्रकरणावरून ट्रोल करणाऱ्यांना पूनम पांडेने उत्तर देखील दिलं होतं. अशामध्ये आता पूनम पांडेने गर्भाशयाच्या कॅन्सरसंदर्भात आणखी एक दावा केला आहे.

पूनम पांडे आणि तिच्या टीमने दावा केला की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी तिला ब्रँड ॲम्बेसेडर बनवणार आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Union Ministry of Health) आणि माझ्या टीममध्ये सध्या चर्चा सुरू आहे. पण आता पूनम पांडेचा हा दावा खोटा ठरला आहे. कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच तिने केलेला दावा फेटाळून लावला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकताच पूनम पांडेसंदर्भात एक महत्वपूर्ण निवेदन जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या निवेदनामध्ये स्पष्टपणे सांगितले की, 'पूनम पांडेला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात येणार नाही.' त्यामुळे अशाप्रकारचा दावा करून पूनम पांडे पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे. आता पूनम पांडे तिने केलेल्या या नव्या दाव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

पूनम पांडेने गर्भाशयाच्या कॅन्सरवर नुकताच आणखी एक दावा केला आहे. तिने सांगितले की, या विषयावर जनजागृती करण्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेची ती ब्रँड ॲम्बेसेडर होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम पांडे आणि त्यांची टीम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी याबाबत चर्चा करत असून त्याची अंमलबजावणी करण्याचे मार्ग शोधले जात आहेत. पण अशामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच पूनम पांडेने केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

Poonam Pandey
Kiara Advani आणि Sidharth Malhotra ची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, रोममध्ये केला होता लग्नासाठी प्रपोज

३ फेब्रुवारीला पूनम पांडेने स्वत:च्याच मृत्यूची खोटी अफवा पसरवली होती. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाल्याचे पूनम पांडेने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत सांगितले होते. तिच्या निधनामुळे (Poonam Pandey Death) सर्वांना मोठा धक्का बसला होता. पण रविवारी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पूनम पांडेने स्वत:च्या मृत्यूची अफवा का पसरवली असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर तिने गर्भाशयाच्या कॅन्सरची जनजागृती करण्यासाठी हे कृत्य केले असल्याचा दावा केला होता. पण पूनम पांडेला मृत्यूचे हे खोटं नाटक करणं आता चांगलेच महागात पडले आहे. पूनम पांडेच्या या कृत्यावर संताप व्यक्त करत नेटिझन्स तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.याप्रकरणी पूनम पांडेविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

Poonam Pandey
Baby John Poster: 'बेबी जॉन'चे पोस्टर आऊट, खतरनाक अवातारामध्ये दिसला वरुण धवन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com