Baby John Poster: 'बेबी जॉन'चे पोस्टर आऊट, खतरनाक अवातारामध्ये दिसला वरुण धवन

Varun Dhavan First Look Form Baby John: बुधवारी वरुण धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बेबी जॉन'चे आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील वरुण धवनचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
Varun Dhavan First Look Form Baby John
Varun Dhavan First Look Form Baby JohnSaam Tv

Baby John Poster Out:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याचा अपकमिंग चित्रपट 'बेबी जॉन'मुळे (Baby John Movie) चर्चेत आहे. सोमवारी ॲटलीने या चित्रपटाच्या टायटलसोबत धमाकेदार टीझर आऊट केला होता. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर आऊट करण्यात आला आहे. नुकताच रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये वरुण धवनचा रागीट आवतार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे हे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे.

बुधवारी वरुण धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बेबी जॉन'चे आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील वरुण धवनचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हे पोस्टर पाहून वरुणच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. हातामध्ये शस्त्र घेतलेला आणि चिडलेला वरुण धवनचा हा लूक पहिल्यांदाच सर्वांनी पाहिला असेल. या पोस्टरच्या बॅकग्राऊंटमध्ये विलन दिसत आहे. हे पोस्टर सध्या चांगेलच व्हायरल होत आहे.

बेबी जॉनचे पोस्टर शेअर करत वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'घट्ट पकडून ठेवा. प्रवास एकदम खतरनाक होणार आहे. बेबी जॉन 31 मे रोजी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येतोय.' वरुणच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवर अनेक सेलिब्रिटींनी रिअॅक्शन दिल्या आहेत. तसेच वरुणच्या चाहत्यांना देखील हे पोस्टर प्रचंड आवडले आहे.

Varun Dhavan First Look Form Baby John
Sonam Kapoor: सोनम कपूरने नेसली आईची ३५ वर्षे जुनी घरचोला साडी, ट्रेडिशनल लूकने जिंकलं सर्वांचं मन

ॲटलीचा बहुप्रतिक्षित 'बेबी जॉन' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कॅलिसने घेतली आहे. ॲटली, मुराद खेतानी ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि पंजाबी अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे कीर्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Varun Dhavan First Look Form Baby John
John Abraham: जॉन अब्राहमच्या 'वेदा'चे धांसू पोस्टर आऊट, अभिनेत्याच्या मागे उभी असलेली तरुणी आहे तरी कोण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com