बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Aadvani) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा हे बी टाऊनमधील सर्वांचे आवडते कपल आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे आज आपली फर्स्ट एनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. या कपलची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी बरीच वर्षे त्यांचे नाते जगापासून लपवून ठेवले. अखेर मागच्या वर्षी त्यांनी मोठ्या थाटामाटमध्ये लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दोघांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. आज आपण त्यांच्या फर्स्ट एनिव्हर्सरीनिमित्त फिल्मी लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत...
कियारा अडवाणीने स्वत: एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. कियाराने सांगितले होते की, 'लस्ट स्टोरीज'च्या रॅप अप पार्टीमध्ये दोघेही पहिल्यांदा भेटले होते. आम्ही पहिल्यांदा बोललो तेव्हापासून काही असं नातं तयार झालं होतं ते मनापासून होतं.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारामध्ये एक खास बॉन्ड तयार झाले होते. चित्रपटाच्या शूटिंगनंतर दोघेही अनेकदा लंच डेटवर जात असत तर कधी डिनर डेटवर जात होते. दोघांना अनेकदा एकत्र पाहून सिद्धार्थ आणि कियारा हे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. सिद्धार्थ-कियारा त्यांच्या नात्याबाबत कधीच उघडपणे बोलले नाही किंवा त्यांनी याबाबत कधीच अधिकृत घोषणा केली नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या रिलेशनशीपला कधीपासून सुरूवात झाली याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. पण 2019 मध्ये बी-टाऊन सेलिब्रिटींच्या पार्टीत दोघेही एकत्र दिसले होते. त्यानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या नात्याची अफवा पसरली होती. त्यानंतर 2021 मध्ये कियाराच्या वाढदिवसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा स्पॉट झाला होता. त्यानंतर #SidKiara सोशल मीडियावर व्हायरल झाले.
कियाराने 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये सांगितले होते की, सिद्धार्थ त्याच्या कुटुंबासह रोममध्ये सुट्ट्या इन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी कियारा देखील रोममध्येच होती. कोविडमुळे कियारा कौटुंबासोबत सहलीला जाऊ शकली नाही. तिथे सिद्धार्थने एका रेस्टॉरंटमध्ये कँडल लाईट डिनरचा प्लॅन केला होता. तिथे काही लोकं व्हायोलिन वाजवत होते आणि मग सिद्धार्थने गुडघ्यावर येत अंगठी घेऊन तिला प्रपोज केले. एवढेच नाही तर यावेळी 'शेरशाह'मधील डायलॉग बोलत सिद्धार्थ कियाराला प्रपोज करतो. तो म्हणाला होता की, 'दिल्ली का सीधा-साधा लड़का हूं...' ज्यानंतर कियारा इम्प्रेस होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.