Anil Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor: 'फायटर'ने अनिल कपूरला काय शिकवलं?, म्हणाला - 'हा एक अभूतपूर्व प्रवास...'

Fighter Movie: 25 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पोस्टर, टीझर , ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे.

Priya More

Anil Kapoor On Fighter Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) त्याच्या बहुप्रतिक्षित 'फायटर' चित्रपटामुळे (Fighter Movie) चर्चेत आहे. या चित्रपटात अनिल कपूर व्यतिरिक्त हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) , करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 25 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील पोस्टर, टीझर , ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. नुकताच अनिल कपूरने या चित्रपटातून त्याला काय शिकायला मिळालं हे सांगितलं आहे.

फायटर चित्रपटाबद्दल बोलताना अनिल कपूरने सांगितले की, 'हा एक अभूतपूर्व प्रवास होता. मला आशा आहे की हा प्रवास रिलीजनंतरही सुरू राहील. या चित्रपटाने मला शिस्त आणि निस्वार्थ काम शिकवले आहे. आज आर्मी डे आहे आणि ट्रेलर लॉन्च करण्याचा एक उत्तम दिवस आहे. चित्रपटाबद्दल मला खूप उत्सुकता आहे आणि मी भारावून गेलो आहे आणि संपूर्ण टीमसोबत काम करताना मला आनंद झाला आहे.'

अनिल कपूरने ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग यांची भूमिका साकारण्यासाठी फिटनेस प्रवासाला सुरुवात केली. राकेश जयसिंग यांनी प्राणघातक लढाऊ वैमानिकांच्या टीमची देखरेख करण्यासाठी नियुक्त केले आहे. कारण ते पीओकेमध्ये बदला घेण्याच्या तयारीत आहेत. सह-अभिनेता रोशनने अनिल कपूरला त्याच्या वयानुसार दिसणारा आणि कडक शरीरयष्टीमुळे चित्रपटातील सर्वात तरुण सेनानी असे म्हटले आहे.

फायटर भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांच्या गटाची, त्यांचे जीवन आणि साहस यांची कथा आहे. सिद्धार्थ आनंदच्या Marflix Pictures आणि Viacom18 Studios द्वारे निर्मित हा चित्रपट नियोजित फ्रँचायझीमधील पहिला आहे. हृतिक रोशनचा 'फाइटर' हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. यापूर्वी आकाशात चित्रित केलेल्या दृश्यांसाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. पण या चित्रपटातील दृश्य खरी आहेत. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या 'फायटर' चित्रपटाचे बजेट 250 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT