Ae Watan Mere Watan Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Ae Watan Mere Watan: 'ऐ वतन मेरे वतन'मधून इम्रान हाश्मीचा फर्स्ट लूक आऊट, 'या' स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेत दिसणार

Ae Watan Mere Watan Movie: काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सारा अली खानचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता या चित्रपटामध्ये केमिओ करणाऱ्या इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे.

Priya More

Emraan Hashmi First Look:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अपकमिंग चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन'मुळे (Ae Watan Mere Watan Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सारा अली खानचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता या चित्रपटामध्ये केमिओ करणाऱ्या इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी स्वातंत्र्य सेनानी राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारणार आहे.

कन्नन अय्यर दिग्दर्शित सत्य घटनेवर आधारित 'ऐ तन मेरे वतन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दरब फारुकी आणि अय्यर यांनी लिहिलेल्या या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर इमरान हाश्मी एका खास कॅमिओमध्ये दिसणार आहे. आगामी देशभक्तीपर थ्रिलर 'ऐ वतन मेरे वतन'मध्ये इम्रान हाश्मी राम मनोहर लोहिया यांची भूमिका साकारणार आहे. आता नुकतेच या चित्रपटातील इम्रान हाश्मीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

देशभक्तीवर आधारित बहुप्रतिक्षित चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन' या महिन्यात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. सारा अली खानच्या या चित्रपटात इमरान हाश्मी राम मनोहर लोहिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या नव्या पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. इम्रानचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचवेळी इम्रानही या भूमिकेत चांगला दिसत आहे.

इम्रान हाश्मी आणि प्राइम व्हिडीओने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटातील नवीन पोस्टर शेअर केले आहे. इम्रान हाश्मीचा या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहिर केली आहे. इम्रानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'स्वातंत्र्याचा निर्भय आवाज प्रसारित करत आहे!' या कॅप्शनसह त्याने पोस्टर शेअर केले आहे. या ऐतिहासिक पात्राच्या इम्रानच्या चित्रणाची एक आकर्षक झलक यात पाहायला मिळत आहे.

या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना इम्रानने सांगितले की,' त्याने यापूर्वी कधीही स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारलेली नाही. राम मनोहर लोहिया यांच्या भूमिकेत स्वत:ला कास्ट करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. अशा कथेचा एक भाग बनणे हा माझ्यासाठी बहुमान आहे.' तसंच, सारा अली खान आणि इम्रान हाश्मी व्यतिरिक्त, ए वतन मेरे वतनच्या कलाकारांमध्ये सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ'नील आणि आनंद तिवारी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 21 मार्च 2024 रोजी थेट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्मशानभूमीत लिंबू-खिळ्यांचा थरार; गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट|VIDEO

Accident News :एसटी बसची दुचाकींना धडक, अपघातात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघेजण जखमी

Mobile Care Tips : फोन पावसात भिजून बंद पडला? 'या' घरगुती टिप्स एकदा ट्राय कराच, खर्चही वाचेल

Nepal Protest : गृहमंत्री, पंतप्रधानांचा राजीनामा; नेपाळमध्ये सत्तापालट घडवून आणणारा ३६ वर्षीय तरुण कोण?

Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या सभेत राडा; शोमिका महाडिक आक्रमक,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT