Elvish Yadav आणि Maxtern चा पॅचअप, इन्स्टाग्रामवर एकत्र लाइव्ह येत सांगितलं नेमकं काय घडलं?

Elvish Yadav And Sagar Thakur: एल्विश यादव हा काही वेळापूर्वी मॅक्सटर्नसोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला. त्याने सांगितले की, आता त्यांच्यामध्ये सर्व काही स्पष्ट झाले आहे. आमच्यात काहीच भांडण किंवा वैर नाही.
Elvish Yadav And Maxtern
Elvish Yadav And MaxternSaam Tv
Published On

Elvish vs Maxtern:

'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) चा विनर एल्विश यादव (Elvish Yadav) आणि यूट्यूबर सागर ठाकूर उर्फ मॅक्सटर्न (Sagar Thakur) यांच्याती वाद आता मिटला आहे. एल्विश यादवने सागर ठाकूरला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या होत्या. पण अशामध्ये आता या दोघांमधील वाद मिटल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यामध्ये आता मैत्री झाली आहे. एल्विश यादव हा काही वेळापूर्वी मॅक्सटर्नसोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला. त्याने सांगितले की, आता त्यांच्यामध्ये सर्व काही स्पष्ट झाले आहे. आमच्यात काहीच भांडण किंवा वैर नाही. तर सागर ठाकूरने सांगितले की, 'गैरसमज झाला होता आणि हे सर्व काही कोणाच्या तरी प्रभावाखाली केले होते.

काही दिवसांपूर्वी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. ज्यामध्ये एल्विश यादव यूट्यूबर सागर ठाकूरला बेदम मारहाण करताना दिसला होता. नंतर सागरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर केला आणि एल्विशवर मारहाण केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. सागर ठाकूरच्या तक्रारीवरून गुरुग्राम पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुरूग्रामच्या सेक्टर 53 पोलिस ठाण्यात एल्विश यादवविरुद्ध कलम 147, 149, 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पण आता एल्विश यादव आणि सागर ठाकूर यांच्यातला वाद मिटलला असून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आहे. इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन त्यांनी आपला वाद मिटला असल्याचे जाहिरपणे सांगितले. एल्विश म्हणाला की, 'जे काही झाले, भाऊ जे काही बोलला ते रागाच्या भरामध्ये होते. त्यामुळे मला प्रचंड राग आला. तुम्ही आत्तापर्यंत जे काही व्हिडिओ पाहिले आहे. जी काही लढत झाली ते स्पष्ट आहे. आता माझ्याकडून सामाजिकदृष्ट्या कोणतीही अडचण येणार नाही.

मॅक्सटर्नने सांगितले की, 'कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन मी एल्विशसोबत असं केलं. पण मी त्याचे नाव उघड करणार नाही. माझा थोडा गैरसमज झाला.' मॅकस्टर्न पुढे म्हणाला की, मला कोणीतरी भडकवले होते. मी येथे त्यांचे नाव घेणार नाही.' मध्येच एल्विश सांगतो की, 'भावाने जे काही केले ते दुसऱ्याच्या सांगण्यावरून केले. सध्या नाव घेऊ नका. नंतर बघू.'

Elvish Yadav And Maxtern
Shaitaan Box Office Day 3: पहिल्याच विकेंडला पाहायला मिळाली 'शैतान'ची जादू, आतापर्यंतच्या एकूण कमाईचा आकडा किती?

एफआयआरनंतर गुरुग्राम पोलिसांनी एल्विश यादवला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. सागर उर्फ ​​मॅक्सटर्नने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, एल्विशने त्याला भेटण्यासाठी गुरुग्रामला बोलावले. मात्र एल्विश 8-10 जणांसह तेथे पोहोचला आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर व्हिडीओ शेअर करताना एल्विश म्हणाला होता की, 'तो बिग बॉसमध्ये गेल्यापासून मॅक्सटर्न त्याच्यावर आरोप करत होता. जेव्हा मी मॅक्सटर्नला गुरुग्रामला बोलण्यासाठी बोलावले तेव्हा त्याने तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत जाळण्याची धमकी दिली.'

Elvish Yadav And Maxtern
Swapnil Joshi: 'नाच गं घुमा'च्या निर्मितीनंतर स्वप्निल जोशी'बाई गं'मध्ये करणार अभिनय, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com