Fan Shivering After Meet Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख खानला पाहून थरथर कापू लागला चाहता, किंग खानने असं काही केलं की होतंय कौतुक, VIDEO व्हायरल

Fan Shivering After Meet Shah Rukh Khan: शाहरुख खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या साधेपणासाठीही खूप चर्चेत असतो. किंग खानचा आता असाच काहीसा व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

Priya More

Shah Rukh Khan Viral Video:

बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखच्या चित्रपटाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून एकही सुपरहिट चित्रपट न दिलेल्या शाहरुख खानने 2023 मध्ये बऱ्याच कालावधीनंतर बॉक्स ऑफिसवर धमाकेदार पुनरागमन केले. शाहरुख खानचे या वर्षामध्ये एकापाठोपाठ एक असे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. शाहरुख खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या साधेपणासाठीही खूप चर्चेत असतो. किंग खानचा आता असाच काहीसा व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

किंग खानचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर येत असतात ज्या माध्यमातून तो चाहत्यांची मनं जिंकत असतो. 2023 मध्ये शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये शाहरुख खान प्रसिद्ध गायिका आशा भोसलेच्या हातातील प्लेट आणि ग्लॅस उचलताना दिसत होता. यानंतर आता 2024 च्या पहिल्याच महिन्यामध्ये किंग खानचा असा व्हिडीओ समोर आला आहे जो सर्वांचे मन जिंकत आहे. शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 'डंकी' चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान चाहत्यांच्या भेटण्यासाठी गेला होता तेव्हाचा असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमादरम्यान किंग खानने अनेक चाहत्यांसोबत सेल्फी काढले. यावेळी शाहरुख खानला त्याचा असा एक चाहता भेटतो जो त्याला पाहून थरथर कापू लागतो. आपल्या चाहत्याची ही अवस्था पाहून शाहरुख खान त्याला मिठी मारतो.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शाहरुख खानला त्याचा एक चाहता भेटताना दिसत आहे. किंग खानला प्रत्येक्षात पाहून त्याचा चाहत्याला अश्रू अनावर होतात. तो थरथर कापू लागतो आणि रडू लागतो. त्यानंतर शाहरुख खान त्याला मिठी मारतो आणि त्याच्याशी गप्पा मारतो. त्यानंतर शाहरुख त्याच्यासोबत फोटो काढतो. शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

शाहरुख खानच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप चांगली पसंती मिळत आहे. शाहरुख खान ज्या स्टाईलमध्ये त्याच्या चाहत्यांसोबत बोलतो आणि त्याला मिठी मारतो हे सर्वांना प्रचंड आवडत आहे. शाहरुख खानच्या या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'आजपासून तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला'. तर आणखी एका युजर्सने लिहिले की, 'जर आम्ही किंग खानला भेटलो असतो तर आमचीही अशीच अवस्था झाली असती.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT