'पठान' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा 'फायटर' चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' मध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादूकोण आणि अनिल कपूर सह तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहे.
देशाच्या वायू दलाने केलेल्या कामगिरीवर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. टीझर, गाणे आणि ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्या विकेंडला दमदार कमाई केल्यानंतर सोमवारी 'फायटर' चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरलेला पाहायला मिळत आहे. पण असं असलं तरीही चित्रपटाने पहिल्या पाच दिवसातच १०० कोटींचा आकडा गाठला आहे.
'फायटर' चित्रपटाने पाच दिवसांमध्ये एकूण १२६. ५० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २२.५ कोटी, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चित्रपटाने ३९.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी २७.५ कोटी, चौथ्या दिवशी २९ कोटी, तर पाचव्या दिवशी जेमतेम ८ कोटी रूपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकड सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने शेअर केले आहे. चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांकडून आणि कलाकारांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटामध्ये प्रेक्षकांना व्हिजुअल इफेक्ट्स, कम्प्यूटर ग्राफिक्स आणि दमदार ॲक्शन याचे सर्व मिश्रण प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवले आहे. वायू सेनेने सादर केलेले हवाई प्रयोग सर्वाधिक पाहाण्यासारखे ठरले आहे. एकंदरीच चित्रपटाचे कथानक फारच उत्तम असून प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अर्थात २५ जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटात हृतिक रोशनसोबत दीपिका पदुकोण, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच ऋषभ साहनी, अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोवर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख ही स्टारकास्ट सुद्धा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.