Munawar Faruqui: अन् मुनव्वर डोंगरीला 'बिग बॉस 17'ची ट्रॉफी घेऊनच गेला, मोठी गर्दी करत चाहत्यांनी केलं जंगी स्वागत; VIDEO व्हायरल

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui: मुनव्वर डोंगरीमध्ये येताच त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. मुनव्वरसोबत फोटो काढण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते त्याठिकाणी आले होते.
Munawar Faruqui Grand Welcome In Dongry
Munawar Faruqui Grand Welcome In DongrySaam Tv
Published On

Munawar Faruqui Grand Welcome In Dongry:

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने (Munawar Faruqui) नुकताच 'बिग बॉस 17'ची (Bigg Boss 17) ट्रॉफी जिंकली. सध्या मुनव्वरवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मुनव्वर मुंबईच्या डोंगरी (Dongri) परिसरामध्ये राहतो. त्याने बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर 'या शोची ट्रॉफी डोंगरीला घेऊनच येईल' असे आश्वासन चाहत्यांना दिलं होतं.

त्याप्रमाणे चाहत्यांना दिलेले आश्वासन मुनव्वरने पूर्ण केले आणि या शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनव्वर ती घेऊन डोंगरीला गेला. मुनव्वर डोंगरीमध्ये येताच त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली. मुनव्वरसोबत फोटो काढण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते त्याठिकाणी आले होते. मुनव्वरला हो शो जिंकण्यामध्ये त्याच्या डोंगरीच्या चाहत्यांचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मुंबईतील डोंगरी हा परिसरच चांगलाच चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे मुनव्वर फारूकी आहे. मुनव्वर याच ठिकाणी राहतो. मुनव्वरने बिग बॉस शो जिंकल्यानंतर या शोची ट्रॉफी घेऊन तो त्याच्या डोंगरीतील चाहत्यांना भेटण्यासाठी गेला. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी मुनव्वरला खूप पाठिंबा आणि प्रेम दिले. मुनव्वरने 2022 मध्ये 'लॉक अप' शो जिंकला होता. आता त्याने बिग बॉस 17 ची ट्रॉफी देखील आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूपच आनंदीत आहे. मुनव्वर डोंगरीमध्ये आल्यानंतर त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मुनव्वरने देखील कारच्या सनरूफमध्ये उभं राहून आपल्या चाहत्यांचे आभार मानले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुनव्वरची कार डोंगरीमध्ये येताच त्याच्या चाहत्यांनी घेराव घातला. त्यानंतर मुनव्वरने आपल्या कारच्या सनरूफमधून बाहेर येत हात जोडून चाहत्यांचे आभार मानले. मुनव्वरचे स्वागत करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी या परिसरामध्ये मोठ-मोठे होर्डिंग्स आणि बॅनर देखील लावले होते. मुनव्वरच्या चाहत्यांनी या ठिकाणी ऐवढी गर्दी केली होती की सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. मुनव्वर आल्यानंतर घटनास्थळावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी त्याच्या चाहत्यांनी डोंगरीची घोषणा देखील केली.

Munawar Faruqui Grand Welcome In Dongry
Akshay Kumar ची मुलगी निताराला कुत्र्याचा चावा, ट्विंकल खन्नाने सांगितला तो किस्सा...

दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मुनव्वर बिग बॉस 17 च्या घरामध्ये गेल्यापासून पहिल्याच दिवसांपासून त्याचे चाहते त्याला सपोर्ट करत होते. साडेतीन महिने बिग बॉसच्या घरामध्ये राहिल्यानंतर अखेर मुनव्वरने या शोची ट्रॉफी जिंकूनच दाखवली. मुनव्वर फारुकीने या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मुनव्वर फारुकीला या शोच्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये आणि कार बक्षीस स्वरुपात देण्यात आली. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खानचे आभार मानले.

Munawar Faruqui Grand Welcome In Dongry
Lagna Kallol Teaser: सिद्धार्थ-भूषण-मयुरीच्या 'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार टीझर रिलीज, एकदा बघाच...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com