Lagna Kallol Teaser: सिद्धार्थ-भूषण-मयुरीच्या 'लग्नकल्लोळ'चा धमाकेदार टीझर रिलीज, एकदा बघाच...

Siddharth Jadhav- Mayuri Deshkukh Movie: काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
Lagna Kallol Teaser
Lagna Kallol TeaserSaam Tv
Published On

Lagna Kallol Movie:

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाचा (Lagna Kallol Movie) धमाकेदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. अशामध्ये आता या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून तो पाहून प्रेक्षकांच्या मनामधील चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरची ते वाट पाहत आहेत.

'लग्नकल्लोळ' चित्रपटाच्या टीमसह या चित्रपटातील तिन्ही कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान आणि मयुरी देशमुख यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. सिद्धार्थने हा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये 'डोईवर पडणार अक्षता, मांडव सजला दारी. वरमाला घेऊन उभी हातात नवरी, टिझर पाहायला मात्र जमली मंडळी सारी!! लग्न कल्लोळ आहेराची तारीख १ मार्च २०२४' या चित्रपटाच्या टीझला अवघ्या काही तासांमध्येच प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली आहे.

टिझरमध्ये दिसत आहे की, पंडीत मुलीची कुंडली वाचत असतात. ते सांगतात मुलीची कुंडली चांगली आहे पण एक गडबड आहे. त्यानंतर मयुरी जोरात काय म्हणून ओरडते. त्यानंतर सिद्धार्थसोबत मयुरी लग्नमंडपात दिसते. सिद्धार्थ आईल म्हणतो की होणार तर हिच माझी बायको होणार. त्यानंतर तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नासाठी प्रपोझ करतो. यावरून मयुरी नक्की कोणासोबत लग्न करणार? असा प्रश्न टीझर पाहून सर्वांना पडला आहे.

Lagna Kallol Teaser
Pushpa 2 The Rule: अल्लु अर्जूनच्या 'पुष्पा 2: द रुल'च्या रिलीज डेटबाबत मोठी घोषणा, 'या' दिवशी येतोय भेटीला

मयुरीचे लग्न कोणाशी होणार सिद्धार्थशी की भूषणशी हा संपूर्ण ‘लग्नकल्लोळ’ तुम्हाला चित्रपट रिलीज झाल्यावर पाहायला मिळणार आहे. आता मयुरी वरमाला नक्की कोणाच्या गळ्यामध्ये घालणार आहे याचे उत्तर तुम्हाला १ मार्चला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये भूषण प्रधान अथर्वच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ जाधव हा मारूतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मयूरी देशमुख ही श्रृतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या तिन्ही कलाकारांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि फर्स्ट लूक शेअर केला होता.

दरम्यान, मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. हा चित्रपट 1 मार्च 2024 ला प्रदर्शित होणार आहे.

Lagna Kallol Teaser
Kuch Khattaa Ho Jaye: गुरू रंधावाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'कुछ खट्टा हो जाये'मध्ये सई मांजरेकरसोबत करणार काम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com