पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'अमर सिंग चमकीला'मुळे चर्चेत आहे. इम्तियाज अली (Imtiaz Ali) दिग्दर्शित हा चित्रपट अमर सिंग 'चमकिला' (Chamkila Movie) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ हा अमर सिंग यांची भूमिका साकारत आहे. निर्मात्यांनी नुकताच 'अमर सिंग चमकीला'चा ट्रेलर रिलीज केला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अमर सिंह चमकिला यांची भूमिका पंजाबी गायक दिलजीत दोसांझने साकारली आहे. संगीताच्या दुनियेत नाव कमवण्यासाठी त्यांना जगाशी कसा संघर्ष करावा लागला हे 'अमर सिंग चमकीला'च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत असून ती गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
2 मिनिट 37 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमर सिंह चमकीला 'झिरो' या चित्रपटातून पदार्पण केल्याचे दाखवण्यात आले आहे. एक काळ असा होता की, त्याला कोणी ओळखत नव्हते आणि नाव कमवण्याची तळमळ त्यांच्या डोळ्यांत सतत दिसत होती. जेव्हा त्यांनी गाणं गायला सुरू केले तेव्हा त्याच्यावर घाणेरड्या गाण्यांचे आरोप झाले. परंतु अशा गोष्टी त्यांना पुढे जाण्यापासून रोखू शकल्या नाहीत. पण एकीकडे त्यांची लोकप्रियता वाढत असतानाच दुसरीकडे त्यांचे शत्रूही वाढत होते. परिस्थिती अशी होती की त्याच्यावर घाणेरडी गाणी गाण्याचा आरोप झाला आणि लोकांचा एक मोठा गटही त्याच्या विरोधात जाऊ लागला.
अमर सिंह चमकीला हे पंजाब इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते आणि ते पंजाबच्या लोकांच्या हृदयावर राज्य करायचे. त्यांचे संगीत विशेषत: पंजाबमध्ये खूप हिट होते आणि पंजाबमधील सर्वाधिक मानधन घेतलेल्या कलाकारांमध्ये त्यांची गणना होती. या चित्रपटात त्याचा संघर्ष दाखवला जात असतानाच त्याच्या मृत्यूची एक वेदनादायी कहाणीही आहे. एक वेळ अशी आली की अचानक सर्वकाही संपले. कारण अमर सिंह चमकीला यांची कोणीतरी हत्या केली. 1988 मध्ये अमर सिंह पत्नी अमरज्योतसोबत स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी जात असताना काही दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.