Crew: क्रिती सेनॉन- करीना कपूर आणि तब्बू एकाच वेळी चर्चेत! असं काय घडलंय इंडस्ट्रीत?

Kareena Kapoor- Kriti Senon Film: या तिन्ही अभिनेत्रींचा 'क्रू' चित्रपट (Crew Movie) रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट शुक्रवारी म्हणजे उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Kareena Kapoor- Kriti Senon Film:
Kareena Kapoor- Kriti Senon Film:Saam Tv

Crew Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabu) आणि क्रिती सेनॉन (Kriti Senon) सध्या चर्चेत आहेत. या तिन्ही अभिनेत्रींचा 'क्रू' चित्रपट (Crew Movie) रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट शुक्रवारी म्हणजे उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

या चित्रपटातील गाणी, ट्रेलरमधील संवादाला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. या चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना एका दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट चांगली ओपनिंग करण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून चांगली कमाई केली आहे.

दिग्दर्शकाने केलं तिघींचे कौतुक

करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या 'क्रू' चित्रपटामध्ये कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझ हे देखील दिसणार आहेत. या चित्रपटचे दिग्दर्शक राजेश ए कृष्णन यांनी तिन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. अनेकदा मल्टि स्टारर चित्रपटांमध्ये कलाकारांमध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण क्रूच्या सेटवर खूप चांगले वातावरण होते असं कष्णन यांनी सांगितले. तसंच, 'तिन्ही अभिनेत्री खूप गप्पा मारायच्या. त्यांच्यामधील बोलणं थांबवण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावा लागायचा. या तिघींमुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे वातावरण सकारात्मक होते.', असे त्यांनी सांगितले.

ॲडव्हान्स बुकिंगची कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'क्रू' ने आपल्या ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनमध्ये 4431 शोसाठी 31,126 तिकिटे विकली आहेत. ज्यामुळे चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सुमारे 72 लाख रुपयांची कमाई केली आहे. आणखी तिकीटाची विक्री होऊन हा आकडा आणखी वाढण्याची आशा निर्मात्यांना आहे. यामुळे चित्रपट ओपनिंग डेला चांगली कमाई करू शकेल.

एअर होस्टेसच्या भूमिकेत

'क्रू' चित्रपटामध्ये करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसणार आहेत. डबघाईला आलेल्या एअरलाइन्समधअये त्या काम करतात. तिघीही नोकरी आणि कमी पगाराला कंटाळलेल्या आहेत. त्यांना मालकाच्या एका प्रकरणाची माहिती मिळते आणि त्या देखील त्याच्यासोबत सहभागी होतात. यानंतर खरा खेळ सुरू होतो. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. हा चित्रपट तुमचे चांगले मनोरंजन करेल यात काही शंका नाही.

Kareena Kapoor- Kriti Senon Film:
Akshaye Khanna Bday: अक्षय खन्नाच्या करिअरला ब्रेक लागण्यामागे 'हे' होतं सर्वात मोठं कारण

चित्रपटातील गाण्याला पसंती

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी 'चोली के पीचे क्या है' हे गाणं रिलीज केलं. या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. हे गाणं मूळतः 1993 मध्ये आलेल्या 'खलनायक' या सुपरहिट चित्रपटातील माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते. हे गाणं 'क्रू' चित्रपटामध्ये करीना कपूरवर रिक्रिएट करून चित्रित करण्यात आले आहे. मूळ गाणे अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायले होते.

Kareena Kapoor- Kriti Senon Film:
Aai Kuthe Kay Karate Serial: हा प्रवास कायम स्मरणात राहील..., 'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीची आषुतोषसाठी खास पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com