Aai Kuthe Kay Karate Serial: हा प्रवास कायम स्मरणात राहील..., 'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीची आषुतोषसाठी खास पोस्ट

Madhurani Prabhulkar On Omkar Govardhan: अरुंधतीचा दुसरा नवरा अर्थात आशुतोषचा मृत्यू होतो. त्यामुळे अरुंधतीसोबतच मालिकेतील प्रेक्षकांना धक्का बसतो. आशुतोषच्या निधनामुळे अरुंधती पुन्हा एकटी पडते.
Madhurani Prabhulkar On Omkar Govardhan
Madhurani Prabhulkar On Omkar GovardhanSaam Tv

Aai Kuthe Kay Karate Serial:

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मालिकेमध्ये प्रत्येक वेळी नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेमध्ये सतत घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी प्रेक्षकांना देखील आवडत आहे. अशामध्ये अरुंधतीचा दुसरा नवरा अर्थात आशुतोषचा मृत्यू होतो. त्यामुळे अरुंधतीसोबतच मालिकेतील प्रेक्षकांना धक्का बसतो. आशुतोषच्या निधनामुळे अरुंधती पुन्हा एकटी पडते.

अरुंधती आशुतोषच्या आठवणींमध्ये खूपच व्याकुळ झाली असल्याचे मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. या मालिकेमध्ये अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुळकरने (Madhurani Gokhale Prabhulkar) साकारली आहे. तर आशुतोष केळकरची भूमिका अभिनेता ओमकार गोवर्धनने (Omkar Govardhan) साकारली आहे. ओमकारने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर मधुराणी प्रभुळकरने त्याच्यासाठी खास पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

मधुराणीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ओमकारसोबत मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. अरुंधती आणि आशुतोषचा अपघात होतो त्यावेळीचे हे फोटो आहे. हे फोटो शेअर करत मधुराणीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय. आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल....! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल.'

तसंच, 'गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे. १२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे...! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो. हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच. डेलीसोपमध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही आणि त्याचे परिणाम दिसून येतात.' असं मधुराणीने सांगितले.

Madhurani Prabhulkar On Omkar Govardhan
Elvish Yadav: बिग बॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाचा वाईट काळ सुरू होतो का?, एल्विश यादवची पोस्ट नेमकी कुणासाठी

मधुराणीने पुढे ओमकारसोबत सेटवर केलेली धम्माल त्याचसोबत त्याच्या आढवणी देखील सांगितल्या आहेत. 'अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं आणि आजूबाजूचं वातावरण हसत-खेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..!', असे तिने सांगितले.

Madhurani Prabhulkar On Omkar Govardhan
Akshaye Khanna Birthday: 49 व्या वर्षीही अक्षय खन्ना का आहे अविवाहित?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com