Elvish Yadav: बिग बॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाचा वाईट काळ सुरू होतो का?, एल्विश यादवची पोस्ट नेमकी कुणासाठी

Elvish Yadav On Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आल्यावर एल्विशने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Bigg Boss OTT Winner Elvish Yadav
Bigg Boss OTT Winner Elvish YadavSaam Tv

Bigg Boss OTT Winner Elvish Yadav:

'लॉकअप' आणि 'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीला (Munawar Faruqui) मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. हुक्का बारमधून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्यावर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. आता या प्रकरणावर बिग बॉस ओटीटी विनर एल्विश यादवने (Elvish Yadav) सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे. एल्विशने या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय ते आपण पाहणार आहोत...

मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आल्यावर एल्विशने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की,'बिग बॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाचा वाईट काळ सुरू होतो का?' या पोस्टमध्ये त्याने मुनव्वर फारुकीचे नाव घेतले नाही. पण त्याने ही पोस्ट मुनव्वरबद्दलच केली असल्याचे म्हटले जात आहे. एल्विश यादव देखील नोएडा पोलिसांच्या रडारवर आहे. तर दुसरीकडे मुनव्वर फारुकीवर देखील मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एल्विश यादव आणि मुनव्वर फारुकी हे दोघेही बिग बॉसचे विनर आहेत.

एल्विश यादवची ही पोस्ट व्हायरल होत असून नेटकरी त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, 'तुला फेम हँडल करता येत नाही.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'हा यार! आता कोणी नका जाऊ बिग बॉसमध्ये' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'तू जिंकला आहे शो तर तुला माहिती. आम्हीला काय माहिती की वेळ वाइट चालली आहे की नाही ते.'

Bigg Boss OTT Winner Elvish Yadav
Bhool Bhulaiyaa 3 च्या सेटवरून समोर आला कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरीचा फोटो

मुनव्वर जेव्हा 'बिग बॉस 17' मध्ये होता तेव्हा एल्विशसोबत त्याचे अजिबात पटत नव्हते. अनुराग डोवालने ही माहिती दिली होती. पण या शोनंतर दोघांनी एका चॅरिटीसाठी एकत्र क्रिकेट सामना खेळला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे दिसत होते. यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली.

दरम्यान, एल्विश यादवला सापांच्या विषाची तस्करी आणि रेव्ह पार्टी प्रकरणात नोएडा पोलिसांनी अटक केली होती. ५ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला. एल्विश यादव हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याने 'बिग बॉस ओटीटी 2' हा शो जिंकला होता. वाइल्डकार्ड असूनही त्याने विजेतेपद पटकावत इतिहास रचला होता.

Bigg Boss OTT Winner Elvish Yadav
Akshaye Khanna Bday: अक्षय खन्नाच्या करिअरला ब्रेक लागण्यामागे 'हे' होतं सर्वात मोठं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com