Bhool Bhulaiyaa 3 च्या सेटवरून समोर आला कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरीचा फोटो

Bhool Bhulaiyaa 3 Movie: भूल भुलैया 3 च्या माध्यमातून विद्या बालनने पुन्हा एकदा चित्रपटात पुनरागमन केले आहे. या चित्रपटातून विद्या बालनचा एक मस्त व्हिडिओही रिलीज करण्यात आला आहे.
Bhool Bhulaiyaa 3 Movie
Bhool Bhulaiyaa 3 MovieSaam Tv

Kartik Aaryan And Tripti Dimpri Photo:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) आगामी 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटाबाबत त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाबाबत एकामागून एक अपडेट्स समोर येत आहेत. भूल भुलैया 3 च्या माध्यमातून विद्या बालनने पुन्हा एकदा चित्रपटात पुनरागमन केले आहे. या चित्रपटातून विद्या बालनचा एक मस्त व्हिडिओही रिलीज करण्यात आला आहे. यानंतर तृप्ती डिमरीच्या या चित्रपटातील एन्ट्रीने प्रेक्षकांना आनंद झाला आहे.

या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तृप्ती डिमरी या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स देत आहेत. अशामध्ये आता तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या सेटवरील एक नवीन फोटो शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'भूल भुलैया 3' हा चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याच्या स्टारकास्टची चांगलीच चर्चा होत आहे. या सगळ्या दरम्यान तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन यांनी चित्रपटाशी संबंधित एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यनने एक बोर्ड हातामध्ये पकडले आहे. या बोर्डवर 'भूल भुलैया 3' असे लिहिले आहे. शूटिंगदरम्यान चित्रपटाच्या सेटवर काढलेला हा फोटो आहे.

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यन यांनी याला सुंदर कॅप्शनही दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'टिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग. आणि आम्ही भूल भूलैया ३चे पहिले वेळापत्रक पूर्ण केले. वेळापत्रकांमधला हा छोटासा ब्रेक मला अधीर करणार आहे. रूह बाबाच्या केपमध्ये काही वेगळीच जादू आहे.' भूल भुलैया 3 चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपले असल्याची माहिती दोघांनी या पोस्टद्वारे दिली आहे.

Bhool Bhulaiyaa 3 Movie
Elvish Yadav: बिग बॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाचा वाईट काळ सुरू होतो का?, एल्विश यादवची पोस्ट नेमकी कुणासाठी

तृप्ती डिमरी आणि कार्तिक आर्यनच्या या पोस्टवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. कोणी 'भूल भुलैया 3' मध्ये तृप्ती डिमरीच्या जागी कियारा अडवाणीच्या एन्ट्रीची मागणी केली आहे. तर काही यूजर्स या चित्रपटात अक्षय कुमारच्या कॅमिओची वाट पाहत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ' तुमच्या दोघांचे डोळे भूल भुलैया'. कार्तिक आणि तृप्तिच्या या चित्रपटासाठी दोघांचेही चाहते खूपच उत्सुक आहेत.

Bhool Bhulaiyaa 3 Movie
Aditi Rao Hydariने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत गुपचूप केलं लग्न, तेलंगणातील मंदिरात घेतले सात फेरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com