Akshaye Khanna Bday: अक्षय खन्नाच्या करिअरला ब्रेक लागण्यामागे 'हे' होतं सर्वात मोठं कारण

Akshaye Khanna Filmy Career: अक्षय खन्ना हा स्टारकिड असताना देखील त्याला चित्रपटामध्ये काम मिळणं कठीण झाले. यामागचे कारण होतं ते म्हणजे टक्कल. कमी वयात टक्कल पडल्यामुळे अक्षय खन्नाला मुख्य अभिनेत्याचा रोल मिळत नव्हता.
Akshaye Khanna Filmy Career
Akshaye Khanna Filmy CareerSaam Tv
Published On

Akshaye Khanna Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय खन्नाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांमध्ये नाव कमावण्यात यश आले नाही. अक्षय खन्ना हा स्टारकिड असताना देखील त्याला चित्रपटामध्ये काम मिळणं कठीण झाले. यामागचे कारण होतं ते म्हणजे टक्कल. कमी वयात टक्कल पडल्यामुळे अक्षय खन्नाला मुख्य अभिनेत्याचा रोल मिळत नव्हता. आज आपण अक्षय खन्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरला ब्रेक कशामुळे लागला यामागचे कारण पाहणार आहोत...

अक्षय खन्नाचा जन्म २८ मार्च १९७५ साली मुंबईमध्ये झाला. विनोद खन्ना आणि गीतांजली यांचा तो मुलगा आहे. अक्षयचे आई-वडील सध्या या जगामध्ये नाहीत. अक्षय खन्नाने बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने १२वीचे शिक्षण ऊटी येथील लॉरेंस स्कूल, लवडेल येथून पूर्ण केले. अक्षय खन्नाला शिक्षणात फार रस नव्हता. परीक्षेचे त्याला प्रचंड भीती वाटायची. त्यामुळे तो परीक्षा देत नव्हता.

अक्षयला चित्रपटांमध्ये आपले करिअर बनवायचे होते. पण विनोद खन्ना यांचा याला विरोध होता. त्यांनी अक्षयला आधी अभिनय शिकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी त्याला अभिनय शिकण्यासाठी किशोर नमित कपूर अॅक्टिंग स्कूलमध्ये अॅडमिशन घेतलं. या ठिकाणी अक्षयने अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर त्याने हिमालय पुत्र चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अक्षय खन्नाच्या करिअरला ब्रेक लागण्यामागे सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे केस गळती. १९ व्या वर्षापासूनच अक्षय खन्ना केस गळतीच्या समस्येचा सामना करत होता. करिअरमध्ये पुढे जात असताना अक्षय खन्नाची ही समस्या आणखी वाढत गेली. याचा परिणाम त्याच्या फिल्मी करिअरवर पडला. यामुळे अनेकदा अक्षय खन्नाचा कॉन्फिडन्स कमी देखील झाला होता. याच कारणामुळे त्याने आपल्या करिअमरमध्ये अनेक वर्षांचा दोन वेळा ब्रेक घेतला. २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय खन्ना जवळपास ५ वर्षे घरी बसला होता.

Akshaye Khanna Filmy Career
Bhool Bhulaiyaa 3 च्या सेटवरून समोर आला कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरीचा फोटो

अक्षयने एका मुलाखतीत सांगितले होते की, १९ वर्षांचा असताना त्याचे केस गळायला लागले होते. यामुळे अक्षयला खूप काळजी वाटू लागली. चित्रपटात प्रवेश केल्यानंतर त्याची अस्वस्थता आणखीनच वाढली. कारण मुख्य अभिनेत्यासाठी सुंदर दिसणे, शरीरयष्टी आणि केस हे सर्वात महत्त्वाचे असते. हळूहळू अक्षयचे केस गळत गेले आणि टक्कल पडल्यामुळे त्याला कमी चित्रपट मिळाले. पण तरीही अक्षयने विग किंवा पॅच घातला नाही. कालांतराने त्याने हे स्वीकारले.

२००० साली अक्षयने फ्लॉप चित्रपटांमुळे एक वर्षाचा ब्रेक घेतला. २००१ मध्ये तो 'दिल चाहता है' या चित्रपटात दिसला होता. त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर २००२ मध्ये अक्षय खन्ना पहिल्यांदा 'हमराज' चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता. ज्यामध्ये त्याला चांगली पसंती मिळाली होती. हळूहळू अक्षयला हिरोऐवजी साईड रोल मिळू लागले. त्यात त्याला दादही मिळाली.

Akshaye Khanna Filmy Career
Elvish Yadav: बिग बॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाचा वाईट काळ सुरू होतो का?, एल्विश यादवची पोस्ट नेमकी कुणासाठी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com