Akshaye Khanna Birthday: 49 व्या वर्षीही अक्षय खन्ना का आहे अविवाहित?

Why Akshay Khanna Single : अक्षय खन्नाला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे १९९९ साली आलेल्या ताल चित्रपटामुळे. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने अनेक चांगल्या चित्रपटामध्ये कामं केली.
Why Akshay Khanna Single
Why Akshay Khanna SingleSaam Tv

Akshay Khanna Bday:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय खन्ना हा बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. स्टारकिड्स असताना देखील अक्षय खन्नाला फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव कमावण्यात यश आले नाही. वडील विनोद खन्ना यांच्या १९९७ साली प्रदर्शित झालेल्या हिमालय पुत्र चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

पण अक्षय खन्नाला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे १९९९ साली आलेल्या ताल चित्रपटामुळे. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने अनेक चांगल्या चित्रपटामध्ये कामं केली. पण तरी देखील तो बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. आता लवकरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.अक्षय खन्ना ४८ व्या वर्षी देखील अविवाहित आहे यामागे काही कारणं आहेत. आज आपण अक्षय खन्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पर्सनल आणि फिल्मी करिअरविषयी जाणून घेणार आहोत...

अक्षय खन्नाने 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील विनोद खन्ना यांनीच केले होते. पण या चित्रपटामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ताल चित्रपटामुळे अक्षय खन्नाला खऱ्या अर्थाने प्रसिद्ध मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. अक्षयने 'बॉर्डर', 'ताल', 'हलचल', 'हंगामा', 'गांधी माय फादर', 'रेस', 'दिल चाहता है' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यात यश आले नाही.

अक्षय खन्नाच्या पर्सनल लाइफची बरीच चर्चा झाली. अक्षय खन्नाने आजपर्यंत लग्न केले नाही. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. त्याच्या लग्नाची चर्चा झाली होती पण त्याने लग्न केले नाही. अक्षय खन्नाला प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न करायचे होते असे म्हटले जाते. करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत दोघांच्या लग्नाबाबत चर्चा देखील केली होती. पण करिश्माची आई बबिता या नात्यावर खूश नव्हती. कारण त्यावेळी करिश्मा कपूर करिअरच्या उंच शिखरावर होती. करिअरमध्ये अक्षय खन्ना करिश्मापेक्षा मागे होता. अक्षय खन्नाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'त्याला लग्न करायचे नाही.'

Why Akshay Khanna Single
Bhool Bhulaiyaa 3 च्या सेटवरून समोर आला कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरीचा फोटो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com