Rio Kapadia Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rio Kapadia Dies: बॉलिवूडवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘दिल चाहता है’ फेम अभिनेत्याचे निधन

Rio Kapadia Death: ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे.

Chetan Bodke

Rio Kapadia Passed Away

बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईमध्ये येत्या १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. रिओ यांनी अनेक टेलिव्हिजन मालिकेमध्ये आणि बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. रिओ कपाडिया यांनी आमिर खान, शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसारख्या बड्या सेलिब्रिटींसोबत एकत्र काम केले आहे.

मित्र फैजल मलिकने रिओ कपाडिया यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, “मित्रांनो, बातमी सांगताना अत्यंत दुःख होत आहे, रिओ कपाडिया आता आपल्यात राहिलेले नाहीत. १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उर्वरित माहिती तुम्हाला त्यांच्या कुटुंबियांकडून मिळेल.”

रिओ कायमच आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष द्यायचे. अभिनेत्याला कायमच ट्रॅव्हलिंगची आवड होती. अनेकदा ते कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटायला जायचे. रिओ इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय नव्हते. रिओ यांना खेळण्यामध्ये जास्त आवड होती. सोबतच त्यांना स्केचिंगचीही आवड होती. अभिनेता फारसे सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली 'मेड इन हेवन २' ही वेब सीरिज त्यांची अखेरची वेबसीरिज ठरली. याआधी २०२१ मध्ये रिओने 'द बिग बुल'मध्ये अभिषेक बच्चनसोबत प्रमुख भूमिका साकारली होती.

रिओ यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, रिओ यांनी 'हॅपी न्यू इयर', 'मर्दानी', 'प्रधानमंत्री', 'हम हैं राही कर के', 'श्री', 'एक अनहोनी', 'मुंबई मेरी जान', 'मुंबई मेरी जान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'दिल चाहता है' याशिवाय त्यांनी 'चक दे ​​इंडिया'मध्येही काम केले आहे. याशिवाय रिओ अनेकदा टेलिव्हिजन जगतातही बरेचसे सक्रिय होते. स्टार प्लसवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका 'महाभारत'मध्ये त्यांनी पांडूची भूमिका साकारली होती. ही मालिका २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याशिवाय 'सपने सुहाने लडकपन के'मधूनही रिओयांनी बरीच लोकप्रियता मिळवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT