Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Shruti Vilas Kadam

जेवणाच्या वेळा वारंवार चुकवू नका

वेळेवर जेवण न केल्यामुळे भूक वाढणे आणि नंतर गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळे नियमित वेळेत संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा.

Late Night Eating Habit | Social Media

झोपेकडे दुर्लक्ष करु नका

पुरेशी झोप न घेतल्यास थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. साधारणपणे दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करावा.

sleep problems | pinterest

दिवसभर पुरेसे पाणी प्या

शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. दिवसभर नियमितपणे पाणी प्या. हवामान बदलानुसार पाण्याची गरज बदलते.

drink water | pinterest

शारीरिक हालचाल करा

सतत बसून काम करणे आणि व्यायाम न करणे यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कामाच्या दरम्यान अधूनमधून उठून चालावे. तसेच व्यायामासाठी वॉक, सायकलिंग, रनिंग करावी.

exercise | pinterest

सतत जंक फूड खाणे

जास्त प्रमाणात साखर आणि मीठ असलेले अन्न खाऊ नयेत. त्यापेक्षा फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये खा. आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी ते नियंत्रित ठेवा.

Early Dinner

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे

सततचा तणावाचा झोप, मनःस्थिती आणि रोजच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे ध्यान, योग, चालणे आणि आवडत्या छंदांसाठी वेळ काढा.

stress | pinterest

आजारपणाकडे दुर्लक्ष करणे

वारंवार थकवा जाणवणे, सतत डोकेदुखी होणे किंवा मळमळ याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Headache after reading | PINTREST

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Lack of sleep | pinterest

Jowar vs Bajra vs Ragi: ज्वारी, बाजरी की नाचणी? कोणत्या पिठात किती कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन; जाणून घ्या फरक

Jowar vs Bajra vs Ragi | Saam Tv
येथे क्लिक करा