Shruti Vilas Kadam
ज्वारीच्या पिठात प्रोटीन, फायबर असतात. ज्वारीमध्ये नॅचरली ग्लूटेन नसते. त्यामुळे ग्लूटेन टाळणाऱ्या व्यक्तींसाठी ज्वारीचा उत्तम पर्याय आहे. ज्वारीच्या पिठापासून भाकरी, धिरडे आणि इतर पदार्थ बनवता येतात.
बाजरीच्या पिठात प्रोटीन, लोह, फायबर आणि मॅग्नेशियम असते. शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवण्यासाठी बाजरीचा आहारात समावेश करा. बाजरीची भाकरी भाजी, डाळ किंवा चटणीसोबत खाणे चांगला पर्याय आहे.
नाचणी म्हणजेच रागी हा कॅल्शियमचा स्रोत आहे. कॅल्शियम हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. नाचणीच्या पिठापासून भाकरी, लापशी, डोसा आणि धिरडे तयार करता येतात.
१०० ग्रॅम ज्वारीमध्ये १०.४ ग्रॅम, बाजरीमध्ये ११.८ ग्रॅम आणि नाचणीमध्ये ७.७ ग्रॅम प्रोटीन असते.
कॅल्शियमच्या बाबतीत १०० ग्रॅम ज्वारीमध्ये २५ मिग्रॅ, बाजरीमध्ये ४२ मिग्रॅ, नाचणीमध्ये ३५० मिग्रॅ कॅल्शियम असते.
बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण तुलनेने जास्त असते. ज्वारी, बाजरी आणि नाचणी या तिन्हीमधून फायबर मिळते. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
कॅल्शियमसाठी नाचणी, प्रोटीन आणि आयर्नसाठी बाजरी, तर रोजच्या भाकरीसाठी ज्वारीचा उत्तम पर्याय आहे. मात्र, संतुलित आहारासाठी डाळी, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थही खा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.