Diabetes : तुमच्या किचनमधील 'हे' ५ पदार्थ देतात रक्तातील साखरेला बुस्ट, आजच खाणे करा बंद

Shreya Maskar

मधुमेह

मधुमेहाचे रुग्ण आपल्या घरात एकतरी असतोच. मधुमेहींनी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून काही पदार्थांचे सेवन टाळावे.

Diabetes | pinterest

साखर- मिठाई

साखर, गुलाबजाम, जिलेबी, पेढे, लाडू आणि साखरेपासून तयार केलेल्या मिठाईमध्ये अतिरिक्त साखर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे मधुमेहाच्या लोकांनी हे पदार्थ खाणे टाळा.

Sugar- sweets | pinterest

कोल्ड ड्रिंक्स

शीतपेये, पॅकेज्ड फळांचे रस, एनर्जी ड्रिंक्स आणि साखर घातलेली सरबते यांमध्ये भरपूर अतिरिक्त साखर असू शकते. या पेयांमुळे कमी वेळात शरीरात मोठ्या प्रमाणात साखर जाऊ शकते.

Cold drinks | pinterest

मैद्याचे पदार्थ

पांढरा ब्रेड, केक, पेस्ट्री, बिस्किटे आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ यांमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात. काही पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर आणि चरबीही असते.

flour | pinterest

तेलकट पदार्थ

समोसा, भजी, वडे, फ्रेंच फ्राइज आणि इतर तळलेल्या पदार्थांमध्ये कॅलरी व चरबी जास्त असू शकते. त्यांचे वारंवार सेवन केल्याने वजन वाढण्याचा आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Oily foods | pinterest

पॅकेज्ड स्नॅक्स

गोड बिस्किटे, चॉकलेट, साखरयुक्त ब्रेकफास्ट सीरिअल्स आणि काही पॅकेज्ड स्नॅक्समध्ये अतिरिक्त साखर व रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असू शकतात.

Packaged snacks | pinterest

'ही' घ्या काळजी

ठरावीक वेळेला संतुलित आहार घ्या. रक्तातील साखरेची तपासणी वेळेवर करा. आहारात भाज्या, फायबर आणि प्रथिनांचा योग्य समावेश करा.

Take care of this | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : वारंवार लघवीला जावे लागतेय? युरिन इन्फेक्शन की डायबिटीज, कसे ओळखाल?

UTI vs Diabetes | AI PHOTO
येथे क्लिक करा...