Shreya Maskar
वारंवार लघवीला जावे लागत असेल, तर त्यामागे युरिन इन्फेक्शन, मधुमेह किंवा इतर कारणे असू शकतात. विशेषतः रात्री वारंवार लघवीला होणे, लघवी करताना जळजळ ही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
युरिन इन्फेक्शन आणि मधुमेह या दोन्ही स्थितींमध्ये वारंवार लघवीला होत, मात्र त्यासोबत दिसणारी इतर लक्षणे वेगळी असतात. केवळ एका लक्षणावरून नेमके कारण ठरवता येत नाही.
युरिन इन्फेक्शनमध्ये लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. अचानक आणि वारंवार लघवीची इच्छा होते. लघवीत रक्त दिसते.
मधुमेहाची समस्या असल्यास वारंवार आणि तुलनेने जास्त प्रमाणात लघवी होते. सतत तहान लागते. अशक्तपणा जाणवतो. वजन कमी होते.
लघवीमध्ये संसर्गाची चिन्हे आहेत का हे तपासण्यासाठी युरिन टेस्ट करा. तसेच रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ब्लड शुगर टेस्ट करा.
ताप, थंडी वाजणे, कंबर किंवा पाठीच्या एका बाजूला दुखणे, उलट्या किंवा लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणे किडनीच्या संसर्गात दिसतात.
वारंवार लघवी होण्यासोबत जळजळ होत असेल तर युरिन इन्फेक्शनची शक्यता विचारात घेतली जाते. तर सतत तहान लागणे, जास्त प्रमाणात लघवी होत असेल तर मधुमेहाची शक्यता असू शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य टेस्ट करूनच औषधोपचार सुरु करावा. विनाकारण कोणतीही औषधे खाऊ नये, याचा किडनीवर खराब परिणाम होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.