TRP Of Marathi Serial: 'आई कुठे काय करते' मालिकेचा TRP घसरला; तर नुकतीच प्रदर्शित झालेली 'प्रेमाची गोष्ट' ठरली अव्वल

Top Marathi Serial: टीआरपी रेटिंगमध्ये 'प्रेमाची गोष्ट' मालिकेने 'आई कुठे काय करते' मालिकेला टाकले मागे.
TRP Rating Of Marathi Serial
TRP Rating Of Marathi SerialSaam TV
Published On

Premachi Gosht Took Place Of Aai Kuthe Kay Karte:

चित्रपटांपेक्षा मालिका पाहणार प्रेक्षकवर्ग जास्त आहे. चित्रपट एकदा येऊन निघून जातात. पण मालिका आणि मालिकेतील पात्र दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येतात आणि त्यांचे मनोरंजन करतात. त्यामुळे मालिकेतील ही पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्यातील भाग होऊन जातात.

या मालिकांसाठी त्यांचा टीआरपी खूप महत्त्वाचा असतो. २ ते ८ सप्टेंबर २०२३चे टीआरपी रेटिंगचे आकडे समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली 'प्रेमाची गोष्ट' मालिका आघाडीवर आहे.

TRP Rating Of Marathi Serial
Premachi Gosht Serial: 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताच्या आयुष्यात येणार नवा पार्टनर, VIDEO शेअर करत दाखवली झलक

मराठी टेली बझ या इंस्टाग्राम पेजने मराठी मालिकांचे ऑनलाईन रेटिंग शेअर केले आहे. या यादीत 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. या मालिकेने 'आई कुठे काय करते' या मालिकेचे स्थान घेतले आहे. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता किती आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तेजश्री प्रधानला मराठी टेली बझने मालिकेच्या या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधानाने देखील ही पोस्ट तिच्या इंस्टग्रामवर शेअर केली आहे.

तर 'ठरलं तर मग' ही मालिका तिचे पाहिले स्थान टिकविण्यात यशस्वी झाली आहे. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तेजश्री प्रधान ची 'प्रेमाची गोष्ट' आणि जुई गडकरीची 'ठरलं तर मग' या मालिकांमध्ये चांगलीच सुरस पाहायला मिळणार आहे. तर या यादीतील टॉप १० मालिका या स्टार प्रवाहवरील आहेत.

टॉप १० मालिका

१) ठरलं तर मग

२) प्रेमाची गोष्ट

३) आई कुठे काय करते

४) सुख म्हणजे नक्की काय असतं

५) रंग माझा वेगळा

६) ठिपक्यांची रांगोळी

७) लग्नाची बेडी

८) तुझेच मी गीत गात आहे

९) मुरांबा

१०) मन धागा धागा जोडते नवा

'प्रेमाची गोष्ट'

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रसारित झाली आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपुर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार आहेत. या मालिकेत राज हंचनाळे सागर नावाचे पात्र साकारत आहे. तर तेजश्री प्रधान मुक्ता हे पात्र साकारत आहे. विरुद्ध स्वभावाचे सागर आणि मुक्ता सईसाठी एकत्र येतात. हा या मालिकचा आशय आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com