Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Change: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते बंद राहणार असून वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सांगितले आहेत.
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Saam Tv
Published On: 
  • पुण्यात मार्केटयार्ड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल

  • स्वारगेट ते कात्रज मेट्रो कामासाठी पुण्यातील वाहतुकीत करण्यात आलेत बदल

  • पुणे वाहतूक पोलिसांचे वाहनचालकांसाठी महत्त्वाचे आवाहन

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये तात्पुरते स्वरूपात बदल करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुणेकरांनी वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवास करावा आणि सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अप्पर बिबवेवाडीकडून चंद्रलोक चौक मार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट, मार्केटयार्ड, उत्सव हॉटेलकडे उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांनी डावीकडे वळून तनिष्क शोरूम समोरून अरणेश्वर बस स्टॉप येथून यू टर्न घेऊन स्वारगेटकडे जावे.

स्वारगेटकडून पुणे सातारा रोडने तसेच मार्केट यार्डकडून सातारा, कात्रज, बिबेवाडीकडे जाणारी वाहतूक ही वेलनेस मेडिकल स्टोअर तसेच भापकर पेट्रोल पंपाच्या बाजूने पुष्पमंगल चौकातून कात्रज अपर बिबवेवाडी मार्गे वळविण्यात आली आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune News: पुण्यात राष्ट्रवादीच्या २ बड्या नेत्यांविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

पुष्पमंगल चौकाकडून मार्केटयार्ड, उत्सव हॉटेल चौक येथून उजवीकडे वळण्यास वाहन चालकांना बंदी करण्यात आली आहे. तर मार्केटयार्ड, उत्सव हॉटेल चौक येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आले आहे.

मार्केटयार्डकडून येणाऱ्या वाहनांनी वखार महामंडळ चौक येथून इच्छित स्थळी जावे. नाही तर पुष्पमंगल चौक तनिष्क शोरूम, अरणेश्वर बस स्टॉप येथून यू टर्न घेऊन किंवा वखार महामंडळ चौकातून इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
Pune News: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार बोनस; कुणाला किती रुपये मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com