Dev Anand And Suraiya Love Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dev Anand Love Story: देव आनंद यांना सुरैयासोबत करायचं होतं लग्न, धर्म आडवा आल्याने अधुरी राहिली प्रेम कहाणी

Dev Anand And Suraiya Love Story: एकमेकांवर जीवापाड प्रेम असतानासुद्धा देव आनंद यांची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली.

Priya More

Dev Anand 100 Anniversary:

बॉलिवूडचे (Bollywood) दिवंगत अभिनेते देव आनंद (Dev Anand) यांनी त्याकाळात आपल्या दमदार अभिनयासोबतच हँडसम लूकच्या माध्यमातून लाखो तरूणींच्या हृदयावर राज्य केलं होतं. पण जिच्यावर देव आनंद यांचा जीव जडला होता ती मात्र त्यांना भेटली नाही. ही प्रेम कहाणी आहे देव आनंद आणि सुरैया यांची. एकमेकांवर जीवापाड प्रेम असतानासुद्धा देव आनंद यांची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली. दोघांनाही लग्न करायचे होते पण धर्म आडवा आला. देव आनंद यांची आज १०० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आज आपण देव आनंद यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणार आहोत...

देव आनंद हे हिंदी सिनेसृष्टीतील त्या काळच असे कलाकार होते की त्यांच्याशिवाय हिंदी चित्रपट अपूर्णच होता. देव आनंद आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांची जागा आजही कोणीच घेऊ शकले नाही. त्या काळी ते हिंदी सिनेसृष्टीचे सुपरस्टार होते. देव आनंद यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये खूप यश मिळवले. पण प्रेम प्रकरणामध्ये त्यांना यश मिळाले नाही. देव आनंद आणि सुरैया यांची लव्हस्टोरी खूपच खास होती. त्या काळामध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची खूपच चर्चा झाली होती.

देव आनंद यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२३ साली पाकिस्तानच्या शकरगड येथे झाला होता. कमी वयामध्येच देव आनंद यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपले वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण त्यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता. मुंबईत आल्यानंतर त्यांनी दोन वर्षे मेहनत घेतली. त्यानंतर त्यांना पहिला चित्रपट 'हम हैं एक' मिळाला. दोन वर्षानंतर म्हणजेच १९४८ मध्ये देव आनंद यांनी 'विद्या' चित्रपटात काम केले. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री आणि गायिका सुरैया मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटामुळेच देव आनंद यांचं आयुष्य बदलले.

चित्रपटाच्या सेटवरच दोघांची पहिली भेट झाली. त्यावेळी देव आनंद हे २५ वर्षांचे तर सुरैया २० वर्षांच्या होत्या. एकाच नजरेत देव आनंद सुरैया यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी 'विद्या', 'नीली', 'दो सितारे', 'शायर', 'जीत', 'अफसर' आणि 'सनम' या ७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. देव आनंद यांचे प्रेम एकतर्फी नव्हते. तर सुरैया देखील त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.

'जीत' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देव आनंद यांनी सुरैया यांना ३ हजार किंमतीची हिऱ्याची अंगठी घालत प्रपोज केला होता. दोघांच्या लव्हस्टोरीची त्या काळी खूपच चर्चा झाली. देव आनंद आणि सुरैया यांनी लग्न करायचे देखील ठरवले होते. पण त्यांच्या प्रेमामध्ये धर्म आडवा आला. देव आनंद हे हिंदू आणि सुरैया या मुस्लिम होत्या. त्यामुळे सुरैया यांच्या आजीने लग्नला विरोध केला. कुटु्ंबीयांच्या दबावामुळे सुरैया यांनी देव आनंद यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्याकडून भारताला धक्का, पाकिस्तानसोबत मोठा करार; म्हणाले - इंडियाला PAK कडूनही तेल खरेदी करावे लागेल...

जागेचा वाद टोकाला! महिलेच्या झिंज्या धरत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; घटनेचा VIDEO व्हायरल

Raanjhanaa : सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार; AIनं चक्क क्लायमॅक्स बदलला, रिलीज डेट काय?

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

SCROLL FOR NEXT