बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपटाची (Jawan Movie) प्रेक्षकांमध्ये २० व्या दिवशी देखील कायम आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) जादू करत बक्कळ कमाई करतच सुटला आहे. 'ओपनिंग डे'ला बक्कळ कमाई करत हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.
जवानने कमाईच्या बाबतीत 'बाहुबली २'चा रेकॉर्ड मोडला. भारतीय बॉक्स ऑफिसवर जवानने पहिल्या आठवड्यातच ३९० कोटींची कमाई केली होती. महत्वाचे म्हणजे जवान चित्रपटाने जगभरामध्ये १००० कोटींपार कमाई केली आहे. 'जवान' प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली हे आपण पाहणार आहोत...
'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी १२ कोटी २५ लाखांची कमाई केली होती. रविवारी १४ कोटी ९५ लाखांची कमाई केली. तर सोमवारी या चित्रपटाने ५ कोटी ३० लाखांची कमाई केली. आता हा चित्रपट आज म्हणजेच मंगळवारी ७ कोटींच्या आसपास कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटाच्या कमाईचा ग्राफ जरी पडला असला तरी देखील जवान आतापर्यंत चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे.
'जवान' चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ३९० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने १३६ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाला ४० कोटींपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आले आहे. अजून देखील चाहत्यांमध्ये जवानची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहामध्ये शाहरुख खानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
१ ला दिवस - ७५ कोटी
२ रा दिवस - ५३.२३ कोटी
३ रा दिवस - ७७.८३ कोटी
४ था दिवस - ८०.१ कोटी
५ वा दिवस - ३२.९२ कोटी
६ वा दिवस - २६ कोटी
७ वा दिवस - २३.२ कोटी
८ वा दिवस - २१.६ कोटी
९ वा दिवस -१९.१ कोटी
१० वा दिवस - ३१.८ कोटी
११ वा दिवस - ३६.८५ कोटी
१२ वा दिवस - १६.२५ कोटी
१३ वा दिवस - १४.४ कोटी
१४ वा दिवस - ९.६ कोटी
१५ वा दिवस - ८.१ कोटी
१६ वा दिवस - ७.६ कोटी
१७ वा दिवस - १२.२५ कोटी
१८ वा दिवस - १४.९५ कोटी
१९ वा दिवस - ५.३० कोटी
२० वा दिवस - ७ कोटी
दरम्यान, तिसऱ्या सोमवारी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आता ६०० कोटींच्या टप्पा पार कमाई करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाने जगभरामध्ये १००० कोटींचा आकडा पार केला आहे. दरम्यान,'जवान'चे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, एजाज खान, सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक स्टार्सनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्त आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटात खास कॅमिओ केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.