
सध्या बॉलिवूडमध्ये जबरदस्त आणि दमदार चित्रपटांची रिघ लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘टायगर ३’चा अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाला होता. हा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या टीझरची आणि ट्रेलरची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांमध्ये असलेल्या या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २७ सप्टेंबरला अर्थात उद्या सोशल मीडियावर ‘टायगर ३’चा एक व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अर्थात २७ सप्टेंबरला ‘टायगर ३’मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर ३’ संबंधित हा व्हिडीओ नसून त्याला ‘टायगरचा मॅसेज’ असे म्हटले जात आहे. टीझर २७ सप्टेंबरला प्रदर्शित करण्यामागील कारण म्हणजे, त्या दिवशी ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि यशराज फिल्म्सचे संस्थापक यश चोप्रा यांचा वाढदिवस आहे. म्हणून त्या खास दिवशी ‘टायगरचा मॅसेज’ सोशल मीडियावर रिलीज करण्यात येणार आहे. हा एक प्रकारचा टीझर असेल, फक्त याला नाव वेगळे देण्यात आले आहे. त्या टीझर व्हिडीओमध्ये चाहत्यांना ‘टायगर ३’ ची झलक पाहायला मिळणार आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफचा हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सलमान- कतरिनासोबत इमरान हाश्मीही ‘टायगर ३’मध्ये, मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अर्थात ट्वीटरवर ट्रेड ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी ‘टायगर ३’च्या टीझरसंबंधित महत्वाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ट्रेड ॲनालिस्ट मनोबाला विजयबालन आपल्या पोस्टमध्ये सांगतात, “मेगास्टार सलमान खानच्या ‘टायगर ३’चा टीझर २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.”
‘टायगर ३’च्या प्रमोशन कॅम्पेनला आजपासून सुरुवात झाली असून चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघा दीड महिना उरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान चित्रपटामध्ये एजंट टायगरच्या भूमिकेत दिसणारा आहे. या टीझरमध्ये सलमान प्रेक्षकांना कोणता संदेश देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
टीझरनंतरच चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येणार आहे. बिगबजेट ठरलेला हा चित्रपट YRF Spy Universe मधील हा चित्रपट ठरणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाश्मी, रेवती, रिद्धी डोगरा आणि रणवीर शौरी हे सेलिब्रिटी दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.