Mudassar Khan Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mudassar Khan Marriage: 'बॉडीगार्ड'च्या कोरिओग्राफरचं लग्न, रिसेप्शन पार्टीला हटके स्टाइलमध्ये पोहचला सलमान खान

Mudassar Khan Got Married With Girlfriend Riya Kishanchandani: मुदस्सरच्या निकाहला बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आणि या कपलला शुभेच्छा दिल्या.

Priya More

Mudassar Khan Wedding:

बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान (Mudassar Khan) विवाहबंधनात अडकला आहे. मुदस्सरने नुकताच गर्लफ्रेंड रिया किशनचंदानीसोबत (Riya Kishanchandani) लग्न केले. त्याच्या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुदस्सरने स्वत: देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. मुदस्सरच्या निकाहला बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आणि या कपलला शुभेच्छा दिल्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुदस्सरने निकाह केल्यानंतर आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. या पार्टीला सलमान खानने हजेरी लावली. सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सलमान खानचे कोरिओग्राफर मुदस्सर खानसोबत जुने नाते आहे. मुदस्सरने सलमान खानच्या अनेक चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे. 'दबंग', 'बॉडीगार्ड' आणि 'रेड्डी' या चित्रपटांसाठी त्याने कोरिओग्राफी केली आहे.

मुदस्सर खान आणि रिया किशनचंदानीच्या लग्न आणि रिसेप्शन पार्टीला आणखी खास बनवण्यासाठी सलमान खानने हजेरी लावली. सलमान खान कॅज्युअल लूकमध्ये दिसला. सलमानने जीन्स आणि शर्ट परिधान केला होता. आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना कोरिओग्राफर मुदस्सरने आपल्या पत्नीचे वर्णन जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असे केले आहे. मुदस्सरने लग्नाचे फोटो शेअर करत अतिशय सुंदर कॅप्शन दिले आहे.

मुदस्सरने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, 'अलहमदुलिल्लाह. जगातील सर्वात सुंदर व्यक्ती रिया किशनचंदानीसोबत लग्न केले. आमच्या सर्व मित्रांचे, चाहते आणि आमच्या दोन्ही कुटुंबांचे समर्थन आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रार्थनेत कायम लक्षात ठेवा...' मुदस्सरने लग्नामध्ये क्रीम कलरची शेरवानी घातली होती. तर रियाने मॅचिंग कलरचा लेहेंगा कॅरी केला आहे. याशिवाय तिने रेड कलरची ओढणी घेतल्याचे देखील दिसत आहे.

मुदस्सरची पत्नी रिया किशनचंदानीबद्दल सांगायचे झाले तर, ती 'स्प्लिट्सविला' आणि 'मिका दी वोटी' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली आहे. रिया व्यवसायाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 'मैं होना की नहीं होना', 'स्वॅग दी सवारी' आणि 'तेनू दसेया' यासारख्या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT